राज्य नाट्यस्पर्धा...............लोगो
(१६ नोव्हेंबर पान ६)
- rat१८p७.jpg-
P२५O०५०९९
रत्नागिरी ः राज्य नाट्यस्पर्धेत श्रीरंग, रत्नागिरी या संस्थेने केलेल्या ‘येऊन येऊन येणार कोण?’ या नाटकातील एक क्षण. (नरेश पांचाळ- सकाळ छायाचित्रसेवा)
---
‘येऊन येऊन येणार कोण?’
मधून राजकीय वास्तवाचे चित्रण
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ ः राजकीय पटलावर सध्या अनेकप्रकारे उलथापालथ होत असते. सोसायटीचे सचिवपद मिळालेल्या तरुणाला नगरसेवक होण्याचे बळ मिळते; पण त्यातही तो मार खातो. नगरसेवकही होता येत नाही. कारण, राजकारण करण्यासाठी समाजसेवा करणे पर्याप्त असते. केवळ राजकीय पटलावर नेता म्हणून मिरवताना देशासाठी, समाज सुधारण्यासाठी स्वतःलाही बदलावे लागते. याचे तंतोतंत उदाहरण राज्य नाट्यस्पर्धेत चैतन्य सरदेशपांडे लिखित श्रीरंग-रत्नागिरी या संस्थेच्या ‘येऊन येऊन येणार कोण?’ या नाटकातून रसिकांना पाहायला मिळाले. ज्येष्ठ रंगकर्मी भाग्येश खरे यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले होते. अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना आणि विनोद अशा चोहोबाजूंनी नाटक रंगतदार झाले. रसिकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
---
काय आहे नाटक?
पुण्यातील एका सोसायटीमध्ये राहणाऱ्या बापट कुटुंबाची कथा ‘येऊन येऊन येणार कोण?’ या नाटकात लेखकाने मांडली आहे. ही कथा सर्वसामान्य कुटुंबभोवती फिरणारी आहे. त्या कुटुंबात बुजुर्ग व्यक्ती माई-अण्णा, त्यांचा मुलगा सुधीर, पत्नी माधवी आणि त्यांचा नातू यश असे राहात असतात. ते जिथे राहात असतात त्या सोसायटीची निवडणूक असते. त्यात सुधीर बापट हे सोसायटीच्या सचिवपदी २४ मतांनी विजयी होता. पुढे सुधीर नगरसेवकपदासाठी उभा रहातो. त्याने समाजासाठी तसे काहीच केलेले नसते; पण वडील अण्णा त्याला सांगतात की, राजकारणात पडू नको; पण तो ऐकत नाही. निवडणुकीला उभा राहतो. त्यासाठी मुलगा यश, पत्नी-माधवी, माई हे सारेच प्रयत्न करतात. माई व अण्णा हे दोघेही वयस्कर असतात. माईला तर विस्मरणाचा आजार असतो; पण असे असले तरीही माई मुलाला मदत करत असते. निवडणूक होते त्यात सुधीरला दोनच मते पडतात. ज्या वॉर्डमधून उमेदवार म्हणून उभा राहतो तिथे त्याला फक्त दोनच मते पडतात. तो पराभूत होतो. हे त्याला सहन होत नाही. घरातील सर्वांना तो विचारतो; पण प्रत्येकजणं मी मत तुम्हालाच दिले, असे सांगतो. प्रत्यक्षात तसे घडलेले नसते; पण सुधीर प्रत्येकाकडून कुणी मत दिले, याची शहानिशा करतो. माई विस्मरणामुळे मत दिले नाही, म्हणून सांगते. मुलगा अथर्व मला निवडणूक कक्षात घेतले नाही, असे सांगतो तर माधवी पतीप्रेमासाठी त्याला मत का दिले नाही, याचा खुलासा करते. शेवटी अण्णांनी मत दिले असल्याचा त्याचा भ्रम होतो. सुधीरचे स्वतःचे मत आणि अण्णा अशी दोन मते मिळाली असावीत, असा कयास होतो. तो अण्णाच्या वागण्यावर खूष होतो. त्याचवेळी सुधीरचा मुलगा यश फोनवरून सांगतो की, निकालात घोळ झाला आहे. मतदान योग्य झालेले नाही. पुन्हा एक आशा सुधीर बापट कुटुंबात जागृत होते. त्या वेळी यशचा मित्र सांगतो, अरे तुझ्या वडिलांना मत दिले तेही फुकट गेले. त्या वेळी दोन मतं कुणाची यावर शहानिशा होते. त्या वेळी सुधीरही सांगतो, मी मतदान करताना माझ्या डोळ्यावर काळोख आला होता. मग दोन मतं कुणाची? आधी समाजसेवा, सोसायटीची कामे तरच पुढचा प्रवास यशस्वी होत असतो, असे त्याला अण्णा सांगतात. एक साधा माणूस देश बदलवू शकत नाही का? एक सज्जन नेता म्हणून पुन्हा नगरसेवकापर्यंत मजल मारणार, अशी शपथ सुधीर घेतो. अशी कथा येऊन ‘येऊन येणार कोण? या नाटकाची आहे. राजकीय पटलावर सामान्य माणसाला निवडणूक लढवताना येणाऱ्या समस्या यांचे उत्तम सादरीकरण रत्नागिरीतील श्रीरंग या संस्थेने केले आहे. नेपथ्य, अभिनय यामध्ये खिळवून ठेवणारे नाटक रसिकांना पाहायला मिळाले.
---
सूत्रधार आणि सहाय्य
प्रकाशयोजना- यश सुर्वे, पार्श्वसंगीत- प्रतीक गोडसे, नेपथ्य -रंगभूषा – सत्यजित गुरव, वेशभूषा- पल्लवी गोडसे.
-----
पात्र परिचय
अण्णा- भाग्येश खरे, माई-प्रतिभा केळकर, यश-अथर्व करमरकर, माधवी-मयुरा जोशी, सुधीर- गोपाळकृष्ण जोशी.
---
आजचे नाटक
बुधवारी (ता. १९) ला नाटक -ऑक्सिजन, सादरकर्ते- नेहरू युवाकेंद्र, नाट्य मंडळ पाली. स्थळ- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी. वेळ- सायंकाळी ७ वा.
---