कोकण

-पावस शौचालयाच्या टाकीची दूरवस्था

CD

-rat१८p११.jpg-
२५O०५१०८
पावस ः राजापूर सागरीमार्गावरील पावस बसस्थानकातील शौचालयाला कुलूप लावण्यात आले आहे.
---
पावस शौचालयाच्या टाकीची दुरवस्था
दुर्गंधीमुळे प्रवासी हैराण; पालकमंत्र्यांचे आश्वासनही अपूर्णच
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १८ ः प्रवासी जनतेच्या मागणीनुसार, पावस बसस्थानकामध्ये बांधण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालयाची टाकी चुकीच्या पद्धतीने बांधल्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरत आहे. शौचालयाची टाकी परिवहन खात्याला साफ करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने अखेर त्याला कुलूप लावण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे.
पावस बसस्थानकातील शौचालयाची दुरवस्था झाल्यामुळे त्या ठिकाणी नवीन शौचालय बांधण्यात यावे, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती. त्यामुळे पावस ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियानांतर्गत २ लाख ६७ हजार रुपये खर्च करून शौचालय बांधण्यात आले. त्यानंतर पावस बसस्थानक इमारत व परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले; परंतु नव्याने बांधलेल्या शौचालयाच्या टाकीचे काम योग्य न झाल्याने शौचालयाची टाकी वारंवार भरते आणि त्यातून पाणी बाहेर पडते. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी सुटते. परिवहन खात्याकडून याची स्वच्छता सुरुवातीच्या काळात केली जात होती. त्यासाठी प्रत्येकवेळी खात्याला दहा ते पंधरा हजार रुपये खर्च येत होता. हा वारंवार होणारा खर्च परवडत नसल्यामुळे शौचालयाला कुलूप लावण्यात आले. बसस्थानकाच्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री आले असता त्यांनी शौचालयाची अवस्था पाहून नाराजी व्यक्त केली तसेच या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढू, असे आश्वासन पावस परिसरातील प्रवासी जनतेला दिले होते; मात्र या गोष्टीला सहा महिने उलटले तरी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे शौचालयाच्या टाकीची साफसफाई करता येत नसल्यामुळे शौचालयाला कुलूप लावण्यात आले आहे. फक्त महिला व पुरुष यांच्यासाठी स्वच्छतागृह सुरू आहे. हे सांडपाणीही बाहेर पडत असून, बसस्थानकातून वाहत असते. त्यामुळे यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
-----
कोट
पावस बसस्थानकातील शौचालयाची टाकी नियमितपणे साफ करत नसल्यामुळे शौचालयाला कुलूप लावण्यात आले आहे. त्यामुळे प्रवासी जनतेला त्याचा काही उपयोग होत नाही. फक्त स्वच्छतागृह सुरू आहे. त्याचे पाणीही टाकीच्या बाहेर वाहत असल्यामुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. शौचालयाची नियमितपणे साफसफाई करावी जेणेकरून स्वच्छ भारत अभियानाचा उद्देश सफल होईल.
- सुरेश तिवरेकर, प्रवासी, गावडेआंबेरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NED, T20 WC: टीम इंडियाचा विजयी चौकार! नेदरलँड्सने दिली कडवी झुंज; आता Super 8s मध्ये भारतासमोर ३ तगडे संघ

मोठी बातमी! उजनीतून सोडलेले पाणी कर्नाटकने आडविले, दक्षिण सोलापूरमधील शेती, गावे तहानली; तरीपण जलसंपदामंत्री विखे पाटील कॉल उचलेनात, वाचा...

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपींनी दिला कबुलीजबाब!

Dumper Accident : भरधाव डंपरची आठ वाहनांना धडक; कात्रज ते वडगावदरम्यान महामार्गावर थरार

Mangalwedha News : 1650 अल्पभूधारक शेतकऱ्यांना मनरेगा योजनेचा लाभ देण्याची सुनंदा आवताडे यांची भरत गोगावले यांच्याकडे मागणी

SCROLL FOR NEXT