05417
ख्रिश्चन असोसिएशनतर्फे
ओटवणे शाळेला साहित्य
सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. १९ ः सिंधुदुर्ग ख्रिश्चन असोसिएशनतर्फे ओटवणे शाळा क्र. १ च्या पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसह अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्हा ख्रिश्चन असोसिएशनचे इलियास गोम्स, जिल्हा खजिनदार तथा कार्यकारी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अँथोनी डिसोजा, उपाध्यक्ष बॅन्हर परेरा, सदस्या सिल्व्हिया फर्नांडिस, पेरपेदिन फर्नांडिस, मीना गोम्स, रेचल डिसोजा, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मंगेश भिसे, दीपक गावकर, मुख्याध्यापक सागर मेस्त्री, शिक्षिका संगीता सावंत, रेणुका कानसे, रुपाली मर्गज, अंगणवाडी सेविका वर्षा गावकर, मदतनीस सौ. कवठणकर आदी उपस्थित होते.
अँथोनी डिसोजा यांनी सिंधुदुर्ग जिल्हा ख्रिश्चन असोसिएशनच्या विविध समाजपयोगी उपक्रमांची माहिती दिली. अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक प्रगती साधावी, असे आवाहन केले. यानिमित्त विद्यार्थ्यांना लाडू व चॉकलेट्सचे वाटप केले. यावेळी मुख्याध्यापक सागर मेस्त्री यांनी शाळेत शैक्षणिक साहित्याचे वितरण केल्याबद्दल असोसिएशनचे आभार मानले. शिक्षिका संगीता सावंत यांनी सूत्रसंचालन केले.