हर्चेत विद्यार्थ्यांनी
बांधले दोन बंधारे
पावस ः लांजा तालुक्यातील हर्चे येथील बॅ. नाथ पै विद्यालयाच्या विद्यार्थी व शिक्षकांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने हर्चेतील तांबेवाडी व पनोरचीवाडी येथे दोन बंधारे बांधले. पाणी अडवा-पाणी जिरवा अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला. या वेळी मुख्याध्यापक बाळासाहेब सरक, शिक्षक अजित गवळी, यु. बी. पाटील, उदय पाटील, गणेश मुळ्ये, सोमनाथ तेंडुलकर, सुनील बागुल, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
निकम विद्यालयाची
उद्योगाला भेट
सावर्डे ः सावर्डे येथील गोविंदराव निकम माध्यमिक विद्यालयाच्या किमान कौशल्य आधारित अभ्यासक्रम विभागामार्फत आगवे येथील ओमकार वेफर्स व फरसाण फॅक्टरीस औद्योगिक भेट देण्यात आली. उद्योगक्षेत्राचे वाढते महत्त्व, उद्योजकतेसाठी आवश्यक असलेली दृष्टी आणि व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे, या उद्देशाने या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. उद्योगाची सुरुवात करताना येणाऱ्या अडचणी, भांडवल उभारणी, उत्पादन प्रक्रिया, स्वच्छता व गुणवत्ता नियंत्रण, बाजारपेठेतील स्पर्धा, अथक परिश्रम आणि योग्य नियोजनाच्या माध्यमातून उद्योग कसा यशस्वी करता येतो या विषयी कंपनीचे मालक एस. जी. कदम यांनी मार्गदर्शन केले.
माखजनात श्रमदानातून
वनराई बंधारे
संगमेश्वर ः संगमेश्वर तालुक्यातील माखजन ग्रामपंचायतीतर्फे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. श्रमदानातून हे बंधारे बांधण्यात आले आहेत. गावातील ग्रामस्थांनीही मेहनत घेतली. सरपंच महेश बाष्टे आणि सदस्यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान प्रभावीपणे राबवल्याने ग्रामस्थांनी कौतुक केले. वनराई बधाऱ्यांमुळे भूजल पातळी वाढण्यास मदत झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.