कोकण

अपघातग्रस्त मित्राला केली लाखांची मदत

CD

काही सुखद---लोगो

-rat२०p२३.jpg-
२५O०५६६८
राजापूर ः महेंद्र घवाळी आणि कुटुंबीयांसमवेत कृषी पदविका अभ्यासक्रमाच्या २००२ ते २००४ या बॅचचे मित्रपरिवार.
----
संकटात उमटला मैत्रीचा सोन्याचा स्पर्श
महेंद्र घावळीला लाखांची मदत; कृषी पदविकेतील मित्रांची साथ
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २० : सध्याच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या जीवनामध्ये नातेसंबंध जोपासताना अनेकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशा स्थितीमध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या लांजा येथील केंद्रामध्ये कृषी पदविका अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतलेल्या वर्गमित्रांनी अपघातग्रस्त रत्नागिरी डोर्ले येथील मित्र महेंद्र घवाळी याला १ लाख १० हजारांची आर्थिक मदत करून मैत्री जोपासली.
कोकण कृषी विद्यापीठाच्या लांजा येथील केंद्रामध्ये २००२ ते २००४ या कालावधीमध्ये अनेक मित्रांनी कृषी पदविका अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतले. येथील शिक्षण पूर्ण केल्यानंतर काहीचे शासकीय नोकरीचे स्वप्न साकारले. तर, काहींचे स्वप्न अद्यापही अधुरे आहे; मात्र या मित्रांनी मैत्रीचे स्नेहबंध जोडून ठेवले आहेत. या बॅचमधील डोर्ले येथील महेंद्र घवाळी याचा दोन वर्षापूर्वी अपघात झाला. या अपघातामध्ये त्याला अपंगत्व आले असून, चालणे-फिरणे मुश्किल झाले आहे.
स्वतःसह आई, पत्नी आणि दोन मुले असे कुटुंब असलेल्या घवाळी कुटुंबातील महेंद्र हा कर्ता पुरुष; मात्र, अपघातामुळे त्याला आलेल्या अपंगत्वामुळे त्याच्या कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटली. ही बाब बॅचमधील त्याचा राजापूरचा मित्र मंगेश राघव आणि अन्य काही मित्रांना समजली. त्यांनी तत्काळ मित्राला मदत करण्याचा निर्धार केला. बॅचच्या मित्रांच्या व्हॉटसअॅप ग्रुपवर मेसेज टाकून महेंद्र घवाळी याला मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. मैत्रीची जाणीव असलेल्या सर्व मित्र-मैत्रिणींनी तत्काळ प्रतिसाद देत केवळ दोन दिवसांमध्ये तब्बल १ लाख १० हजारांची मदत संकलित केली. या सर्व मित्र-मैत्रिणींनी महेंद्र घवाळी याच्या घरी जाऊन ही मदत सुपूर्द केली. मित्रांनी केलेल्या या मदतीमुळे घवाळी कुटुंबीयाला थोडा दिलासा मिळाला असून, त्याबद्दल त्यांच्याकडून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Reliance Industries: रिलायन्सचा अमेरिकेत तेलशुद्धीकरण प्रकल्प; डाेनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, ३०० अब्ज डॉलरचा करार

IKEA Pune: पुणेकरांसाठी खुशखबर! सर्वांच्या आवडीचं IKEA आता पुण्यात; 'इथे' उघडलं पहिलं स्टोअर

काही महिने सोबत राहिले पण... हंसिका मोटवानीचा घटस्फोट कशामुळे झाला? खरं कारण समोर

Horoscope 13 March : 'या' 5 राशींचे उद्या नशिब पलटणार; धनलाभासह मिळेल मोठी खुशखबर, ग्रहांच्या युतीमुळे होणार प्रचंड प्रगती

ओबीसी आरक्षणासाठी नवा नियम! नॉन-क्रीमी लेयरबाबत सर्वोच्च न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय; उत्पन्न निकषांमध्ये महत्त्वाचा बदल

SCROLL FOR NEXT