कोकण

पार्थ, श्रवण, आराध्यला तायक्वांदो स्पर्धेत ‘कांस्य’

CD

05867

पार्थ, श्रवण, आराध्यला
तायक्वांदो स्पर्धेत ‘कांस्य’

कणकवली, ता. २३ : तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने व तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई)तर्फे शिर्डी, अहिल्यानगर येथे महाराष्ट्र राज्य आठवी क्युरोगी व पुमसे राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा झाली. या स्पर्धेत पार्थ राणे, श्रवण राणे आणि आराध्य गोडवे यांनी कांस्यपदक पटकावले.
ही स्पर्धा शिर्डी येथे सिल्वर ओक गार्डन सभागृहात घेण्यात आली. या स्पर्धेत तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गचा कॅडेटचा संघ सहभागी झाला होता. यात मुलींमध्ये ओवी बाईत, दुर्वा पवार, संयुक्तराजे आबदार, शरयू पाटील, रुचा चव्हाण, वैष्णवी कदम, ग्रीष्मा राऊळ तर मुलांमध्ये श्रवण राणे, पार्थ राणे, चिराग रेपाळ, श्रेयस नार्वेकर, रुद्र पाटील, रुद्र सावंत, आराध्य गोडवे, अर्णव काळगे, जैत्र पटेल यांनी सहभाग घेतला होता.
यापैकी ३३ किलो खालील वजनी गटात श्रवण राणे यांनी कांस्यपदक मिळवले तर ३७ किलो वजनी गटात पार्थ राणे याने कांस्यपदक मिळवले. ६५ किलोवरील वजनी गटात आराध्य गोडवे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत कांस्यपदक पटकावले. सर्व खेळाडूंना तायक्वांदो राष्ट्रीय प्रशिक्षक व पंच एकनाथ धनवटे, जयश्री कसालकर अविराज खांडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गचे पदाधिकारी भालचंद्र कुलकर्णी, तायक्वांदो राष्ट्रीय प्रशिक्षक सुधीर राणे, विनायक सापळे, अमित जोशी यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT