- rat२१p२७.jpg-
२५O०५९१४
संगमेश्वर ः देवदिवाळीनिमित्त पानाचे विडे भरताना ग्रामस्थ.
---
जिल्ह्यात देवदिवाळी उत्साहात साजरी
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २२ ः कोकणातील ग्रामीण भागात शुक्रवारी देवदिवाळीचा पारंपरिक सण मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरा झाला. नरक चतुर्दशीच्या जवळपास महिनाभरानंतर येणारी देवदिवाळी ही शेतकऱ्यांची दिवाळी म्हणून खास ओळखली जाते.
जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये हा कार्यक्रम काही ठिकाणी सामुदायिक तर काही ठिकाणी वैयक्तिक पद्धतीने उत्साहात साजरा झाला. घराघरामध्ये पानाचे विडे मांडून सम्राट बळीराजाचे स्मरण करण्यात आले. ‘इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो’ अशी पारंपरिक आळवणीही या वेळी करण्यात आली. त्यानंतर हे विडे परस्परांना वाटून आपापल्या कुटुंबांच्या शुभेच्छा देण्यात आल्या. घरातील विडे भरल्यानंतर त्यातील एक विडा ग्रामदेवतेच्या नावाने वेगळा काढून देवळात नेण्याची प्रथा आजही अनेक गावांमध्ये पाळली गेली. देवदिवाळीच्या शुभमुहूर्तावर विविध देवस्थानांच्या जत्रांनाही पारंपरिक सुरुवात झाली. कोकणच्या मातीतून झिरपणारी ही परंपरा वर्षानुवर्षे न बदलता आजही तितक्याच भक्तिभावाने आणि एकोप्याने पार पडते, हेच यंदाच्या देवदिवाळीने पुन्हा एकदा दाखवून दिलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.