कोकण

खोदलेले चर; अपघाताला निमंत्रण

CD

06194

खोदलेले चर; अपघाताला निमंत्रण

मुणगे-आडवळवाडी रस्त्याची बाजूपट्टी धोकादायक; आंदोलनाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
मुणगे, ता. २३ ः येथील भगवती मंदिर ते आडवळवाडी रस्त्यावर भूमिगत वीज वाहिन्यांसाठी खोदलेले चर व्यवस्थितरित्या बुजविले नसल्याने रस्त्याची बाजूपट्टी वाहतुकीस धोकादायक बनली आहे. रस्त्यावर अस्ताव्यस्त टाकलेल्या वाळूमुळे वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थ व वाहनधारकांतून संताप व्यक्त होत असून, त्वरित कार्यवाही न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मुणगे भगवती मंदिर ते आडवळवाडी रस्त्यावर भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याचे काम महिन्याभरापासून सुरू आहे. यासाठी जेसीबीच्या सहाय्याने रस्त्याच्या एका बाजूपट्टीला चर खोदून भूमिगत वीजवाहिनी टाकण्यात आली; मात्र खोदलेले चर व्यवस्थित बुजविलेले नाहीत. त्यामुळे कोणतेही वाहन बाजू घेण्यासाठी चराच्या बाजूनवरून गेल्यास मातीत रुतणार आहे. रस्त्याच्या बाजूची गटारे बुजविली नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात गटारांचे पाणी रस्त्यावरून जाणार असल्याने पाण्यासह मातीही रस्त्यावर वाहून येणार आहे. बऱ्याच ठिकाणी डांबरीकरण असलेल्या रस्त्याची खोदाई करताना उखडून दुर्दशा केली आहे. हा रस्ता अरुंद असल्यामुळे डंपर, ट्रक, टेम्पो आदी वाहने रस्त्यावरून जाताना समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देता येत नाही. या कामासाठी वापरलेली वाळू रस्त्यावर पडल्यामुळे दुचाकी घसरून अपघात होऊ शकतो. या मार्गावर देऊळवाडी, हरिजनवाडी, सावंतवाडी, लब्देवाडी, भंडारवाडी, आडवळवाडी या वाड्यांचा समावेश आहे. या मार्गावरील ग्रामस्थांचा रहदारीचा हा मुख्य रस्ता असल्याने दिवसरात्र वर्दळ सुरू असते.
---
रस्ता अरूंद असल्याने भीती
ग्रामस्थांनी रस्त्याची दुर्दशा होत असल्याचे लक्षात येताच खोदाईचे काम थांबविले होते. त्यानंतर काम व्यवस्थित करतो, असे सांगून काम पुन्हा सुरू केले होते; मात्र बाजूपट्टीचे काम व्यवस्थित केले नसून गेले पंधरा दिवस काम बंद ठेवले आहे. हा रस्ता अरुंद असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाहनधारक व ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात असून, तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
---
कोट
मिठबाव व आचरा वीजवितरण कार्यालयास पत्र दिले असून बाजूपट्टीचे काम व्यवस्थित करण्याबाबत कळविले आहे. भ्रमनध्वनीवरूनही वारंवार संपर्क केला जात आहे, अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही किंवा सर्व्हे करण्यासाठी कोणीही आले नसल्याचे त्यांनी सांगितले.
- अंजली सावंत, सरपंच, मुणगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad Announcement: द. आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी गिलच्या ऐवजी 'हा' खेळाडू भारताचा कर्णधार; ऋतुराज, जडेजाचे पुनरागमन

मराठी बिग बॉस सुरु होणार? कलर्स मराठीने शेअर केला व्हिडिओ, नेटकरी म्हणाले...'बिग बॉसचा ६ वा सिझन...'

Blind Women's T20 World Cup: भारतीय महिला पुन्हा जगज्जेत्या! कोलंबोत पहिला वर्ल्ड कप जिंकत मानाने फडकवला तिरंगा

Nashik Election : भाजपचा बालेकिल्ला, तरी समस्या कायम! पंचवटी प्रभाग ७ मध्ये बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान

Pune Politics:'पुणे जिल्ह्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीची शिवसेनेबरोबर युती'; दौंडमध्ये भाजपची निवडणुकीच्या रिंगणातून माघार..

SCROLL FOR NEXT