फिरस्ती - लोगो
बिघाडी पथ्थ्यावर पडते की नडते!
सध्या कोण कुणाच्या पक्षातून लढतयं याचा अंदाज बांधण तसं कठीणच झालयं....असं म्हणत तात्या रस्त्याच्या शेजारील चहाच्या ठेल्यावर विसावले. तेवढ्यातच चहा पिण्यासाठी अण्णाही हजर झालेले होतेच. मग काय रोजच्याप्रमाणेच त्या दोघांची चर्चा रंगली. विषय काय राज...कारणाच होताच. तात्यांनी लगेचच विचारल, अरे अण्णा काल कुठतरी वाचलं आघाडीत फूट पडली. अण्णाही चेहरा कडू करून म्हणाले, हो रे...! काय झालं काहीच कळलं नाही. आघाडीतून बाहेर पडतोय असे सांगणारे परवा एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलेले पाहिले. तात्यांनीही री ओढत म्हटल, हो रे...सोशल मीडियावर तो व्हिडीओ मीही पाहिलायं. सध्या राजकारणात काही खरं नाही रे. कोणाचं पांग कोण कधी फेडेल हे समजतच नाही. बहुदा यामागेही आमचे साहेबच असावेत, असं वाटतयं. ही कला त्यांना फार चांगली जमते बुवा. परवा नव्हे त्या मित्रपक्षातल्या तिघांना आपल्याकडे घेऊन थेट रिंगणातच उतरवलं की ! तसा अनुभवच त्यांचा दांडगा ना. कुठून कुठे कुणाला आणतील आणि कुठे उभे करतील याचा नेम नाही. गणित त्यांच तसं पक्कच. त्यावर अण्णा चटकन म्हणाले, आता बघुयात काय होतं ते...बिघाडी पथ्थ्यावर पडते की नडते ते. तसे ते आघाडीत राहीले काय अन् त्यांनी बिघाडी केली काय....त्याचं वजन कीती? हा प्रश्नच आहे. अण्णाच्या गुगलीवर मात्र तात्यांनी हसत हसत चहाचा घोट घेणचं पसंत केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.