कोकण

आचरा शिवरामेश्वर मंडळाची शिर्डीत साईचरणी भजन सेवा

CD

06569

आचरा शिवरामेश्वर मंडळाची
शिर्डीत साईचरणी भजन सेवा
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. २५ ः गेली ३५ वर्षे आपल्या भजन कलेने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या शिवरामेश्वर भजन मंडळाने सोमवारी (ता. २४) सायंकाळी शिर्डी येथील साईबाबा समाधी मंदिरात आपली भजन सेवा सादर करत साईनामाचा जयघोष केला. बुवा रवींद्र गुरव यांनी १९८९ मध्ये शिवरामेश्वर मंडळाची स्थापना केली. गुरव यांच्या स्वरचित भजनी गीतांमुळे आणि भजन सादरीकरणाच्या वेगळ्या शैलीमुळे शिवरामेश्वर भजन मंडळाने जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय भजन स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले होते. आपल्या वेगळ्या शैलीतील भजन गायनाने या भजन मंडळाने सोमवारी साई समाधी मंदिरात आपली भजन सेवा सादर केली.
यावेळी शिर्डी संस्थानतर्फे शिवरामेश्वर भजन मंडळाचा सन्मान करण्यात आला. यावेळी बुवा रवींद्र गुरव यांच्यासह मृदंगमणी जितेंद्र राणे, विरेंद्र पुजारे, उदय घाडी, अर्जुन बापर्डेकर, माणिक राणे, रवींद्र बागवे, लवू घाडी, रमेश पुजारे, गोविंद राणे, विनोद मुणगेकर, जान्हवी राणे, अंजली बापर्डेकर, मानसी राणे, रिद्धी बागवे, रेश्मा घाडी, विनया पुजारे, रेश्मा पुजारे, कविता घाडी, वेदांत बापर्डेकर यांसह शिर्डी संस्थानचे सेवानिवृत्त कर्मचारी राजतिलक बागवे (धाकोरे) आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Local Megablock: एल्फिस्टनचा ब्रीज हटवण्यासाठी मध्य रेल्वेवर २३ तासांचा जम्बो ब्लॉक! पण एका अडथळ्यामुळे प्रशासनाचे काम अडचणीत; काय घडलं?

December 2025 Holiday Trip: कुटुंबासोबत करा 'या' 8 भारतीय स्थळांची सैर, ख्रिसमस अन् नवीन वर्षाचा सेलिब्रेशन होईल खास

Sachin Gujar : मॉर्निंग वॉकला बाहर पडल्यानंतर काँग्रेस जिल्हाध्यक्षांच अपहरण अन् जीवघेणी मारहाण, अहिल्यानगर हादरलं! CCTV पाहा...

Mumbai Crime : कुर्ल्यात वाढदिवस सेलिब्रेशनदरम्यान मित्रांनी अंगावर पेट्रोल ओतून अब्दुल रहमानला जाळलं; धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद

ईशा केसकरने सांगितलं 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिका सोडण्याचं कारण, म्हणाली...'जीवापाड मेहनत करुनही जर...'

SCROLL FOR NEXT