कोकण

आरोग्य तपासणी

CD

साडेतीनशे नागरिकांची
कर्करोग तपासणी
मंडणगड ः मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत पंचायत समिती मंडणगड, तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय मंडणगड आणि वालावलकर रुग्णालय, डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने १८ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत तालुक्यात कर्करोग तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. देव्हारे, म्हाप्रळ, कुंबळे, मंडणगड, पालवणी आणि पंदेरी अशा सहा ठिकाणी पाच दिवस चाललेल्या या विशेष उपक्रमात ३५० रुग्णांची तपासणी करण्यात आली. टाटा हॉस्पिटलचे डॉ. वैभव चंद्रा यांच्यासह सहाय्यक डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफ यांनी हे तपासणी शिबिर पार पाडले. तपासणीत २७० रुग्णांची तोंडाच्या कर्करोगासाठी, १७५ महिलांची स्तन कर्करोगासाठी तसेच १७५ महिलांची गर्भाशय व मुख कर्करोगासाठी तपासणी करण्यात आली. याशिवाय ४५ जणांची लॅब टेस्टही घेण्यात आली. या उपक्रमासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे, गटविकास अधिकारी सुनील खरात, गटशिक्षणाधिकारी कल्याणी मुळे, सहाय्यक प्रशासन अधिकारी मानसी पवार, कनिष्ठ प्रशासन अधिकारी वामन मेंढे, तालुका आरोग्य कार्यालयातील डॉक्टर, नर्स व कर्मचारी, पंचायत समिती मंडणगड कार्यालयातील कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

माखजन बसस्थानकास
नवी झळाळी
संगमेश्वर ः मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अंतर्गत संगमेश्वर तालुक्यातील माखजन बसस्थानकाला सध्या झळाळी आली आहे. माखजन ग्रामस्थांच्या सहकार्याने व लोकवर्गणीतून माखजन एसटी बसस्थानकाला रंगरंगोटी करण्यात आली आहे. श्रमदानातून कुंड्यात झाडे लावण्यात आली आहेत. लोकसहभागातून परिसर स्वच्छ झाल्यामुळे बसस्थानकाची शोभा वाढली आहे. यासाठी सरपंच महेश बाष्टे, सतीश साठे, विशाल रांजणे, लियाकत माखजनकर, एसटी कंट्रोलर चव्हाण व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. या सहकार्याबद्दल माखजन सरपंच महेश बाष्टे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

मंडणगड येथे आज
संविधान सन्मान कार्यक्रम
मंडणगड ः येथील मैत्री फाउंडेशनतर्फे उद्या (ता.२६) संविधान दिनाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात संविधान सन्मान सोहळ्याचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम सकाळी ११ वा. सुरू होणार आहे. सकाळी ९.३० वा. संविधान सन्मान रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्य कार्यक्रमात संविधानपर पोवाडा तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या समूहगीतांचे सादरीकरण केले जाईल. दुपारी विधीतज्ज्ञ अॅड. अमित चांदोरकर यांचे भारतीय संविधान आणि आजची परिस्थिती या विषयावर जाहीर मार्गदर्शन आयोजित केले आहे. कार्यक्रमाला माजी नगरसेवक राजेश मर्चंडे, मनोज मर्चंडे आणि सुशांत मर्चंडे उपस्थित राहणार आहेत. प्रमोद जाधव आणि दयानंद लोखंडे सूत्रसंचालन करतील, तर सुप्रिया मर्चंडे प्रस्तावित करतील. नागरिकांनी संविधान सन्मान सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष मनोज मर्चंडे यांनी केले आहे.

शैक्षणिक साहित्यात
लक्ष्मण चोरगे प्रथम
खेड ः शिक्षणातील गुणवत्ता संवर्धनासाठी आणि शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासासाठी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र पुणे यांच्यावतीने आयोजित तालुकास्तर शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेत तालुक्यातील वाडीबीड शाळेचे उपक्रमशील शिक्षक व कलाप्रेमी मुख्याध्यापक लक्ष्मण चोरगे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांच्या सहल गणिताची या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. चोरगे यांनी सातत्याने विज्ञान प्रदर्शनात आजवर अनेक बक्षिसे पटकावली आहेत. तालुक्यातील अनेक शाळा आपल्या कला कौशल्यातून सजवून शैक्षणिक वातावरण निर्मिती केली आहे. विविध स्पर्धेत ते सातत्याने शिक्षण विभागाचे नाव उज्ज्वल करत असतात. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Gujar : मॉर्निंग वॉकला बाहर पडल्यानंतर काँग्रेस जिल्हाध्यक्षांच अपहरण अन् जीवघेणी मारहाण, अहिल्यानगर हादरलं! CCTV पाहा...

Mumbai Crime : कुर्ल्यात वाढदिवस सेलिब्रेशनदरम्यान मित्रांनी अंगावर पेट्रोल ओतून अब्दुल रहमानला जाळलं; धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद

ईशा केसकरने सांगितलं 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिका सोडण्याचं कारण, म्हणाली...'जीवापाड मेहनत करुनही जर...'

VIDEO : कराड–पाटण मार्गावर दारु पिऊन तरुणीचा रस्त्यावर धिंगाणा; बोनेटवर बसून गाड्या अडवत घातला गोंधळ, दगडफेकही केली

Kolhapur Farmer : शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! कर्जमाफीचा निर्णय लवकरच, बावनकुळेंची कोल्हापुरात ग्वाही

SCROLL FOR NEXT