महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणार
ध्रुवी लाकडे; खारवी पतसंस्थेतर्फे पूर्णगड येथे कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. २६ ः सर्वांनी बचत कशी करावी, सभासदांना लाभ कसा मिळतो आणि पतसंस्थेच्या विविध योजना काय आहेत, त्याचा फायदा कसा करून घ्यावा याविषयी सर्वांना माहिती करून दिली जात आहे. आर्थिकदृष्ट्या आपण सक्षम व्हावे यासाठी पतसंस्था आपल्या पाठीशी आहे, असे ध्रुवी लाकडे यांनी सांगितले.
खारवी समाजविकास नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन संतोष पावरी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णगड येथील विठ्ठल रखुमाई मंदिर सभागृहात सहकार सप्ताहानिमित्त महिला मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी रिद्धी आडविलकर, आकांक्षा डोर्लेकर, ज्येष्ठ समाजसेविका क्रांती हरचकर, आचल हरचकर आदी उपस्थित होते.
खारवी समाजविकास नागरी पतसंस्थेने रत्नागिरी जिल्ह्यात उत्तम कामगिरी करून दीपस्तंभ पुरस्कार प्राप्त केला असल्याचे सांगण्यात आले. या वेळी आडविलकर यांनी पूर्णगड शाखेची वाटचाल कशी सुरू आहे, याबाबत माहिती दिली तसेच कार्यक्रमाला अपेक्षापेक्षा जास्त उपस्थिती लाभल्याबद्दल समाधान व्यक्त केले. शाखापालक वासुदेव वाघे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.