rat26p10.jpg-
06749
रत्नागिरी - जिल्हा साहित्य संमेलनातील कवी संमेलनात अनंत राऊत यांनी कविता सादर केली.
कवितेतून राजकीय, सामाजिक प्रश्नांवर फटकेबाजी
जिल्हा साहित्य संमेलन; अनंत राऊत यांचे सादरीकरण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ ः रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनाच्या समारोपावेळी झालेल्या कवी संमेलनाने कार्यक्रमाची रंगत अधिक वाढली. कवी अरूण इंगवले, संगीता अरबुणे, कैलास गांधी, राष्ट्रपाल सावंत, अभिजित नांदगावकर आदी कवींनी दर्जेदार कविता सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली तर कवी संमेलनाचे अध्यक्ष अनंत राऊत यांच्या सादरीकरणाने त्यात भर पडली. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा या कवितेसह अनेक भावनिक आणि काळजाला भिडणाऱ्या कविता त्यांनी सादर केल्या. मिश्किल शैलीने राजकीय, सामाजिक प्रश्नांवर कवितेमधून यथेच्छ फटकेबाजी केली.
येथील नवनिर्माण महाविद्यालयात शनिवारी (ता. २२) हे कवी संमेलन पार पडले. या वेळी सुरवातीलाच अरूण इंगवले यांनी ‘कविता लिहिल्यासारख्या’ ही कविता सादर केली. त्यानंतर अभिजित नांदगावकर यांनी ‘सावली घनात ओथंबून आली’, अमृता नरसाळे यांनी ‘महाकाव्य’, राष्ट्रपाल सावंत यांनी ‘ज्ञानज्योती झालीस तू सावित्री माई’, अशोक लोटणकर यांनी ‘सांज’, कवी कैलास गांधी यांनी मतले, शेर, गझल सादर केली. संगीता अरबुणे यांनी ‘पुरुष’ कविता सादर केली. कवी अनंत राऊत यांनी सादर केलेल्या ‘बाई’, ‘शिक्षक’, ‘भोंगा’, ‘तो आणि ती’ या कविता समाजातील वास्तव मांडणाऱ्या होत्या. तर लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांना उद्देशून ‘सत्य मांड रं.. गड्या तू सत्य मांड रं...’ ही कविता सादर केली. रसिकांनी या सर्वच कवींना आणि त्यांनी सादर केलेल्या कवितांना तसेच यानंतर ‘कोकणचा साज, संगमेश्वरी बाज’ या नाटकाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
चौकट
साहित्याची भूमिका महत्त्वाची : श्रीगौरी सावंत
भविष्यात लैंगिकता हा प्रश्न वैयक्तीक असण्यासाठी जागृती करणे आवश्यक असून, यात साहित्याची भूमिका महत्त्वाची आहे, असे मत सामाजिक कार्यकर्त्या श्रीगौरी सावंत यांनी संमेलनात व्यक्त केले. संमेलनातील प्रकट मुलाखत संजय वैशंपायन आणि प्रा. अश्विनी कांबळे यांनी घेतली. या वेळी सावंत यांनी स्वतःच्या ट्रान्सजेंडर होण्याचा इतिहास आणि संघर्ष उपस्थितांसमोर मांडला. त्या मूळच्या रत्नागिरीतील असून, शहराजवळील सड्यामिऱ्या हे त्यांचे गाव आहे. त्यांनी कोकणातील लहानपणीच्या आठवणी, गंमतीजंमती सांगितल्या. गणेश ते श्रीगौरी हा प्रवास सोपा नव्हता. गेल्या २० वर्षांत अनेक संकटांवर मात करत समाज व्यवस्थेच्या विरोधात जात तृतीयपंथींना समाजात सन्मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी केलेला संघर्ष त्यांनी मांडला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.