कोकण

किटकनाशक नेणारा ट्रेलर उलटून महामार्ग ठप्प

CD

०६८४८

ट्रेलर उलटला; महामार्ग बंद पडला
हातखंबावासीय भीतीच्या छायेत; अडीच तासांनंतर वाहतूक सुरळीत
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ : मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथील धोकादायक चढावावर आज पुन्हा एकदा अपघात झाला. हायस्कूलसमोरील चढावावर कीटकनाशक रसायनाने भरलेला ट्रेलर ब्रेक निकामी झाल्यामुळे मागे सरकत रस्त्याकडेला उलटला. या अपघाताने पुन्हा एकदा हातखंबावासीयांची भीतीने गाळण उडाली. परिणामी, मुंबई-गोवा महामार्ग सुमारे अडीच तास ठप्प झाला. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रशासनाने दुपारी १ वाजता ट्रेलर बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. आज सकाळी साडेदहा वाजता ही घटना घडली.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, ट्रेलरचालक दशरथ मुनिराज बिंद (वय ४९, रा. मानखुर्द, शिवाजीनगर, मुंबई) हा आज सकाळी ट्रेलर (एमएच ४३ बीपी ४६४६) आयसो टँक लोड करून गोवा फॅक्टरी येथून न्हावाशेवा पोर्ट उरण (रायगड) येथे जात होता. सकाळी साडेदहाच्या सुमारास तो हातखंबा येथील धोकादायक चढावावर आला. केमिकलने भरलेला ट्रेलर असल्यामुळे चढावात त्याची गती कमी होत तो मागे येऊ लागला. त्याचे ब्रेकदेखील अचानक निकामी झाले. त्यामुळे दशरथचा ट्रेलरवरील ताबा सुटला आणि ट्रेलर चढावात मागे येऊन देसाई हायस्कूल येथे रस्त्यात उलटला. त्यामुळे ट्रेलरचे व आयसो टँकचे नुकसान झाले आहे. याबाबत ट्रेलरचालक दशरथ बिंदने ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर, ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव आणि अग्निशमन दल, उपप्रादेशिक परिवहन महामंडळाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते.
अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. वाहतूक पोलिसांनी खबरदारी म्हणून तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले. तसेच क्रेनच्या साह्याने ट्रेलर आणि आयसो टँक बाजूला करून तब्बल अडीच तासांनी मुंबई-गोवा महामार्गावरील खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.

तोकड्या उपाययोजना
मुंबई - गोवा महामार्गावरील हातखंबा गावातील नदीवरील पुलाचे काम अनेक वर्षे रखडले आहे. त्यामुळे तिथे रत्नागिरीकडे येताना तीव्र चढाव आहे. अवजड वाहने याच चढावावर फसतात आणि अपघात होतात. तसेच तो गोव्याकडे जाताना तीव्र उतार होतो. त्यामुळे अवजड वाहनांवर नियंत्रण राहत नाही आणि अपघात होतात. आतापर्यंत चार गंभीर अपघात होऊनदेखील संबंधित यंत्रणा आणि जिल्हा प्रशासन याबाबत गंभीर नाही. सुरक्षेचे उपाय न केल्यास याबाबत कधीतरी उद्रेक होण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

१ वर घेणे

(आणखी छायाचित्रे टुडे पान ३ वर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women Employees: महिला कर्मचाऱ्यांसाठी गेम-चेंजर निर्णय! ‘लवकर या-लवकर जा’ योजना जाहीर; लाभ कसा घेता येणार?

Pune Crime : बनावट सोन्याची बिस्किटे दाखवून महिलांची फसवणूक; आरोपीकडून १२ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

स्टार प्रवाहची नवी मालिका 'बाई तुझा आशीर्वाद'चा प्रोमो समोर; ईशा केसकर नाही 'ही' अभिनेत्री साकारतेय मुख्य भूमिका

Navi Mumbai: पोलिसांचा गुन्हेगारांना दे धक्का! अवैध कारभाराविरुद्ध १४ आरोपींवर गुन्हे दाखल; घणसोलीत धडक कारवाई

Ajit Pawar News: V.K. सिंह यांचं अंडरवर्ल्डशी संबंध, मिटकरींकडे कोणते पुरावे?

SCROLL FOR NEXT