- rat२७p५.jpg-
२५O०६९४८
रत्नागिरी ः आरोग्यविषयक कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. आर. एस. आडकेकर. सोबत डावीकडून डॉ. परवेज पटेल, डॉ. संतोष यादव, डॉ. अनिरुद्ध आठल्ये. डॉ. भास्कर जगताप, डॉ. महेंद्र गावडे आदी.
---
गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा अधिक प्रभावीपणे द्या
डॉ. आर. एस. आडकेकर ः रत्नागिरीत आरोग्य विषयक कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ ः जिल्ह्यातील सर्व नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा अधिक प्रभावीपणे द्या, अशी सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाचे-आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. आर. एस. आडकेकर यांनी दिली.
रत्नागिरीतील शामराव पेजे सभागृहात आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. सार्वजनिक आरोग्यसेवेची गुणवत्ता अधिक प्रभावी व सर्वसामान्य जनतेपर्यंत सुलभपणे पोहोचवण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले. डॉ. आर. एस. आडकेकर यांनी आरोग्यविषयक बाबींचे संगणकीय सादरीकरण करत उपस्थितांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी त्यांनी उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर, सेवा वितरणातील पारदर्शकता, रुग्णकेंद्री सेवापद्धती आणि आरोग्य यंत्रणेमधील समन्वय, उत्कृष्ट सनियंत्रण व पर्यवेक्षणसारख्या अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली.
या कार्यशाळेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव तसेच जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. परवेज पटेल यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या प्रसंगी उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना अधिक गुणवत्तापूर्ण, सुलभ आणि प्रभावी आरोग्यसेवा प्रदान करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.