कोकण

प्रकाश बिले यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक

CD

swt2712.jpg
06986
बांदा ः येथे सापडलेले पैशांचे पाकीट मुळ ममालक राजू पंडित यांना केळी व्यापारी प्रकाश बिले यांनी परत केले.

प्रकाश बिले यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक
बांदाः शहरातील कट्टा कॉर्नर बाजारपेठ या दरम्यान पडलेले पैश्यांचे पाकीट येथील केळी व्यापारी प्रकाश बिले यांना सापडले असता हे पाकिट मुळ मालक राजू पंडीत यांना परत केले. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
श्री. पंडीत हे दोन दिवसांपूर्वी बांदा शहरात लग्नाच्या खरेदीसाठी आले होते. त्यांचे मुळ गाव कास आहे. परंतु, ते सध्या कामानिमित्ताने गुहागर (जि.रत्नागिरी) येथे आहेत. आपल्या काही नातेवाईकांच्या सोबत ते बांदा मार्केट येथे जात असताना त्यांचे पैश्याचे पाकीट कट्टा कॉर्नर बाजारपेठ दरम्यान पडले. हे पाकीट केळी व्यापारी प्रकाश बिले यांना सापडले. त्यांनी तात्काळ याची कल्पना ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख तथा विद्यमान बांदा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांच्या कानावर घातली. श्री. काणेकर यांनी याबाबत सविस्तर माहिती आपल्या विविध व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर केली व आपणास संपर्क साधण्यास सांगितले. हा मेसेज पाकीटाचे मालक श्री. पंडीत यांच्या निदर्शनास आला. त्यांनी श्री. काणेकर यांना मोबाईलवर संपर्क केला. त्यानंतर बिले यांनी ते पाकीट श्री. पंडीत यांना सुपूर्त केले. बिले यांच्या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक होत आहे.
----------------
swt2713.jpg
06987
बांदा ः नाबर प्रशालेत संविधान उद्देशीकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

संविधान उद्देशीकेचे नाबर प्रशालेत वाचन
बांदाः येथील व्ही. एन. नाबर इंग्लिश मिडीयम प्रशाळेत संविधान सन्मान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जाण, लोकशाही मूल्यांबद्दल आदर आणि राष्ट्रीय कर्तव्यांची जाणीव निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपमुख्याध्यापिका शिल्पा कोरगावकर यांनी प्रास्ताविक केले. शाळेतील विद्यार्थी शिक्षक यांनी संपूर्ण संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NED, T20 WC: टीम इंडियाचा विजयी चौकार! नेदरलँड्सने दिली कडवी झुंज; आता Super 8s मध्ये भारतासमोर ३ तगडे संघ

मोठी बातमी! उजनीतून सोडलेले पाणी कर्नाटकने आडविले, दक्षिण सोलापूरमधील शेती, गावे तहानली; तरीपण जलसंपदामंत्री विखे पाटील कॉल उचलेनात, वाचा...

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपींनी दिला कबुलीजबाब!

Dumper Accident : भरधाव डंपरची आठ वाहनांना धडक; कात्रज ते वडगावदरम्यान महामार्गावर थरार

Mangalwedha News : 1650 अल्पभूधारक शेतकऱ्यांना मनरेगा योजनेचा लाभ देण्याची सुनंदा आवताडे यांची भरत गोगावले यांच्याकडे मागणी

SCROLL FOR NEXT