कोकण

रत्नागिरीच्या राजकारणातील प्रभावी फॅक्टर

CD

रत्नागिरीचा रागरंग-------लोगो

रत्नागिरीत अल्पसंख्याकांचा प्रभावी फॅक्टर
नगराध्यक्षपदासाठी चुरस ; सहकारी पक्ष सांभाळण्याची कसब
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी शहरात ६२ हजार मतदान आहे. त्यापैकी २१ हजार म्हणजे एक तृतीयांश मतदार अल्पसंख्याक आहेत. तिरंगी लढतीत मतांचे होणारे विभाजन वा फायदा अजित पवार गटाला होईल, असा त्यांचा विश्वास आहे. रत्नागिरीच्या राजकारणात हा फॅक्टर अधिक प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीतील बशीर मुर्तुजा यांच्या रूपाने खेळली गेलेली खेळी, शिंदे शिवसेनेच्या पथ्थ्यावर पडणारी आहे. त्यामध्ये नगराध्यक्ष कोण होईल, हे मतदार आणि जनता ठरवेल; मात्र या खेळीने अजित पवार गटाचे वर्चस्व चिपळूणपाठोपाठ रत्नागिरीत अधोरेखित होणार, हे निश्चित आहे.

- अभिजित हेगशेट्ये
---
थेट मतदारांमधून महिला नगराध्यक्ष निवडून येण्याची रत्नागिरी नगरपालिकेच्या इतिहासातील पहिलीच वेळ. मागील चार वर्षे निवडणुकांची वाट पाहणारे आणि त्याहीपूर्वी पाच वर्षे पुढील नगराध्यक्षपदाचे स्वप्न पहाणारा पुरुषसत्ताक राजकीय नेते आपल्याच कुटुंबातील महिलांना नगराध्यक्ष आणि नगरसेवकाच्या पदावर पाहत आहेत. स्वतंत्र महिला उमेदवार अपवाद वगळता या रस्सीखेचीत जातीय समीकरणे यांचे गणित फार महत्त्वाचे मानले जाते. याचा परिणाम आपल्यासोबत सर्व जातीचे घटक असावेत, हे गणित येथील चाणक्यांनी अचूक ओळखले आणि अखेरच्या क्षणी महायुती असतानाही भाजपचे थेट तीन नगरसेवकपदाचे उमेदवार पळवून शिंदेसेनेत आणले. भाजपनेही तो प्रयत्न केला; परंतु त्यांना अंतर्गत बंडखोरी थोपवता आली नाही. काँग्रेसच्या कीर स्ट्रॅटेजीने नेहमीप्रमाणे स्वतंत्र बाणा जपला. महाविकास आघाडीने भाजपचा जिल्हाध्यक्षच काबिज करत जी तुफानी प्रचारमोहीम हाती घेत रत्नागिरी शहरात एक गहजब निर्माण केला होता तो सोबतचे सहकारी पक्ष सांभाळताना काही प्रमाणात अखेरच्या टप्प्यात कमजोर झाल्याचे जाणवत आहे.
रत्नागिरीच्या सामाजिक आणि राजकारणाची अचूक ओळख असणारे या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते सुनील तटकरे यांनी येथील नगरपालिकेच्या निवडणुकीचा अचूक अंदाज घेत तिसरा पर्याय तयार करण्याचा डाव टाकला. त्यात रत्नागिरीत त्यांच्या पक्षाचे नव्याने अस्तित्व अधिक सक्षम करताना चिपळूण येथील आमदार शेखर निकम यांना रत्नागिरीची नवी कुमक जोडून देण्याचा राजकीय फासा अचूक पडला. शरद पवार यांचे एकनिष्ठ खंदे समर्थक बशीर मुर्तुजा यांनी अखेरच्या क्षणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे घड्याळ हाती बांधले. स्वार्थासाठी राजकारण, जनमताची फसवणूक वगैरे आरोप जे जे करत होते आता सारे राजकारणी नेमका तोच फॉर्म्युला प्रत्यक्ष निवडणुकीच्या काळात वापरत आहेत.
महाविकास आघाडीतून थेट महायुतीच्या घटक पक्षाकडे स्थलांतर करत अजित पवार गटाकडून निवडणूक लढवणार म्हणजे शिवसेना शिंदे गटाविरोधात त्यांच्याच सहयोगी पक्षाने विरोधात उभे राहण्याचे हे गणित थोडे वेगळेच आहे. यातील बशीर मुर्तुजा यांचे राजकीय गणित अल्पसंख्याक मतांच्या बेरजेचे असल्याचा अंदाज बांधला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता दोन मिनिटांत दाखल होईल FIR, नागपूर पोलिसांनी AI च्या मदतीने विकसीत केली नवी प्रणाली..

Horoscope : उद्या 15 मार्चचा दिवस घेऊन येणार पैसाच पैसा; गजलक्ष्मी योगाने 4 राशींचे नशीब उघडणार, मोठे संकट दूर होणार

Mumbai News: पुन्हा मराठा आरक्षणाचा घाट कशासाठी? विरोधकांचा न्यायालयात युक्तिवाद

IPO नियमांमध्ये मोठा बदल! कंपन्यांना शेअर बाजारात लिस्टिंग सोपे होणार; केंद्र सरकारकडून नवी सुधारणा

Asiatic Election: एशियाटिक निवडणूक आणखी लांबणीवर! मतदार यादीतील गोंधळ कायम, निवडणूक पुन्हा स्थगित; नवीन तारीख काय?

SCROLL FOR NEXT