

Asiatic Society Elections
ESakal
मुंबई : दी एशियाटिक सोसायटीच्या बहुचर्चित निवडणुकीच्या मार्गातील विघ्न संपताना दिसत नाही. मतदार यादीतील गोंधळामुळे धर्मादाय आयुक्तांनी शनिवारी (ता. १४) होणारी नियोजित निवडणूक पुन्हा स्थगित केली आहे. आता ही निवडणूक तीन महिन्यांपर्यंत लांबण्याची शक्यता आहे. चौकशी अधिकारी के. डी. तळोकार यांना सोसायटीच्या प्रशासकपदी नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली व्यवस्थापन समिती नव्याने पात्र मतदारांची यादी तयार करण्याचे काम करणार आहे.