कोकण

भिले कुंभारवाडीतील विहिरकामाचे भूमिपूजन

CD

भिले-कुंभारवाडीतील
विहिर कामाचे भूमिपूजन
चिपळूण, ता. २८ ः कोयना भूकंप पुनर्वसन योजनेंतर्गत भिले-कुंभारवाडी येथील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या विहिरीच्या बांधकामाचे भूमिपूजन नुकतेच पार पडले. गावीतल पाण्यासारख्या मूलभूत गरजेची पूर्तता होत असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. या कामासाठी आमदार शेखर निकम यांनी पुढाकार घेत निधी उपलब्ध करून दिला आहे. भिले-कुंभारवाडी येथील ग्रामस्थांना अनेक वर्षे भेडसावत असलेला पाण्याचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. विकासकामे केवळ आश्वासनात न अडकता प्रत्यक्षात उतरावीत यासाठी आमदार निकम यांनी केलेले प्रयत्न महत्त्वाचे ठरतात, असे ग्रामस्थांनी सांगितले. या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती अधिक होती.

राज्य साक्षरता सल्लागार
समितीवर किरण लोहार
सावर्डे ः राज्य साक्षरता केंद्र सल्लागार समितीत रत्नागिरीचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांची निवड झाली आहे. या समितीत एससीईआरटीचे संचालक राहुल रेखावर यांच्यासह २५ सदस्यांचा समावेश आहे. योजना विभाग शिक्षणाधिकारी पदाची धुरा संभाळताना लोहार यांनी पुणे येथे राज्यस्तरीय उल्लास नवभारत साक्षरता मेळाव्यात रत्नागिरी जिल्ह्याला उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला होता. कार्यक्रमाचा राष्ट्रीय पातळीवर मेळावा दिल्ली येथे झाला. या मेळाव्यात रत्नागिरी जिल्ह्याची उत्तुंग कामगिरी पाहता विशेष कार्याची दखल घेत त्यांची राज्य साक्षरता केंद्र सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आहे. प्राथमिक माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून जिल्हा परिषद रत्नागिरीचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारल्यानंतर विविध उपक्रमामध्ये रत्नागिरी जिल्हा राज्यामध्ये प्रथम येण्यासाठी सूक्ष्म नियोजन लोहार यांनी केले.

कारागृहात नेत्रतपासणी
रत्नागिरी ः मुंबई समता फाउंडेशन यांच्या सहकार्याने येथील विशेष कारागृहातील बंदीजनांसाठी नेत्र शिबिर उत्साहात झाले. या शिबिराचा बंदीजन आणि कर्मचारी यांनी लाभ घेतला. येथील विशेष कारागृहात बंदीजनांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. सामाजिक, आध्यात्मिक उपक्रमांबरोबरच त्यांच्या आरोग्याच्यादृष्टीनेही विविध उपक्रमांचे आयोजन कारागृह अधीक्षकांच्या माध्यमातून केले जाते. याचाच एक भाग म्हणून सोमवारी (ता. २४) मुंबईतील समता फाउंडेशनच्या सहकार्याने कारागृहात नेत्र शिबिर झाले. या वेळी कारागृहातील २ महिला बंदी, ५६ पुरुष बंदी आणि १० कर्मचारी अशा एकूण ६८ जणांची तपासणी करण्यात आली. डॉ. देसाई यांनी नेत्रतपासणी करतानाच या बंदीजनांना तसेच कर्मचाऱ्यांना डोळ्याची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले. या वेळी प्रभारी अधीक्षक सचिन पाटील, तुरुंग अधिकारी अनिकेत गोरवाडकर, पांडरमिस, शरद खोत आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sambhajinagar Industrial Gas Connection: वाळूज उद्योगांना दिलासा! १० मोठ्या कंपन्यांना पाइप्ड गॅस जोडणी सुरू; गॅस टंचाईवर उपाय; वाळूजमधील उद्योगांकडे आता ‘PNG’चा पर्याय

Sambhajinagar Garbage Issue: कुठे ड्रेनेज फुटली, कुठे कचऱ्याचे ढीग; शहरातील नागरिक त्रस्त; घंटागाडी गायब, रस्त्यावर कचरा

Pakistan Afghanistan Conflict : पाकिस्तानचा अफगानिस्तानातील हॉस्पिटलवर हल्ला, ४०० लोकांचा मृत्यू, २५० हून अधिक जखमी झाल्याचा तालिबानचा दावा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 17 मार्च 2026

आजचे राशिभविष्य - 17 मार्च 2026

SCROLL FOR NEXT