कोकण

‘जागृती’ मंडळाचे कार्य गौरवास्पद

CD

07359

‘जागृती’ मंडळाचे कार्य गौरवास्पद

सुरेश ठाकूर ः त्रिंबक जनता विद्यालयात दिनदर्शिका प्रकाशन

सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. ३० ः त्रिंबक गावच्या विकासासाठी जागृत उन्नती मंडळ या संस्थेने निधी उपलब्ध होण्याकरिता २०२६ ची दिनदर्शिका जनता विद्या मंदिर त्रिंबक येथील सभागृहात प्रकाशित केली. यातून मिळणारा निधी गाव विकासासाठी वापरला जाणार आहे. जागृत मंडळाची गाव विकासाची तळमळ कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार साहित्यिक सुरेश ठाकूर यांनी त्रिंबक येथे काढले.
जागृत मंडळाने प्रसिद्ध केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन श्री. ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष दत्ता पवार, चेतन साटम, अरविंद कदम, खजिनदार संतोष त्रिंबककर, अनिल कदम, तुषार चिंदरकर, मंगेश शेटे, दिगंबर साटम, सुनील जाधव, विश्वंभर राउत, ग्रामीण शाखेचे बाळा बागवे, उदय मेहेंदळे, किशोर त्रिंबककर, आशिश बागवे, सीताराम सकपाळ, श्रीकांत बागवे, संभाजी शेटगे, संतोषी सावंत, अजय पवार, सुचिता घाडीगावकर, नेहा वेंगुर्लेकर, माधुरी कामतेकर, ग्रीष्मा बागवे, अस्मिता वर्देकर, छाया साटम, अर्चना त्रिंबककर, अशोक बागवे, विशाल मेस्त्री उपस्थित होते.
सचिव अरविंद कदम यांनी प्रास्ताविक करताना दिनदर्शिकेसाठीच्या देणगीचा आढावा मांडला. खजिनदार त्रिंबककर यांनी प्राप्त देणगी आणि झालेला खर्च याबाबत सभागृहाला माहिती दिली. दिनदर्शिकेकरिता देणगी देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. श्री. ठाकूर यांच्या ‘शब्दांच्या पलीकडे’ या पुस्तकाच्या ५० प्रती जागृत मंडळाकडून मुख्याध्यापक प्रवीण घाडीगावकर यांच्याकडे दिल्या. मंगेश शेटे यांनी सूत्रसंचालन केले. नवनीत घाडीगांवकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: एकाच पदासाठी वेगवेगळ्या परीक्षा नको, शुल्कही वाचणार! मंत्री शेलार यांची विधानसभेत माहिती

Mobile App to Predict Cancer Risk: कर्करोगाचा अंदाज आता मोबाईलवर! टाटा रुग्णालयातील संशोधकांची निर्मिती; जोखमीचे मूल्यांकन शक्य

Pune University flyover: पुण्यातील विद्यापीठ चौकाच्या उड्डाणपुलावरुन जाताना उडतोय गोंधळ; अर्धवट कामामुळे अपघाताचा धोका

उन्हाचा तडाखा वाढला! दिवसभरात प्या ४ लिटर पाणी, जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष, नागरिकांनी लहान मुलांची, ज्येष्ठांची कशी घ्यावी काळजी? वाचा...

Akola News : टी-२० विजयाच्या जल्लोषानंतर अकोल्यात तणाव; दोन गटात वादः वाहनांची तोडफोड, दगडफेकीत नुकसान

SCROLL FOR NEXT