०७६७०
वाढावा
०७६७१
‘जीवन प्राधिकरण’चे गोदाम खाक
रत्नागिरीत घटना ः ९ लाख ५० हजारांच्या एचडीपी पाईप भक्ष्यस्थानी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३० ः शहराजवळील नाचणे येथील ‘महाराष्ट्र जीवन प्राधिकरण’च्या गोदामाला अचानक आग लागून ते खाक झाले. गोदामातील एचडीपी पाईपही भस्मसात झाल्या. ही घटना रविवारी (ता. ३०) सकाळी आठच्या सुमारास घडली. आगीचे कारण समजू शकलेले नाही. वाऱ्यामुळे आणि आजूबाजूच्या परिसरातील वाळलेल्या गवतामुळे आग पसरली. प्राधिकरणाचे ९ लाख ५० हजारांचे नुकसान झाले आहे. एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर पालिकेसह एमआयडीसीच्या अग्निशमन दलाने आग नियंत्रित केली.
नाचणे येथील हवामान केंद्रासमोरील मोकळ्या जागेत जीवन प्राधिकरणाचे गोदाम आहे. या परिसरातील बाजूच्या जागेत सुकलेल्या गवताला अचानक आग लागली. गोदामाच्या बाहेरील बाजूला असलेल्या वाळलेल्या गवताला आग लागलेली होती. रविवारी (ता. ३०) सकाळी वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे आग वेगाने पसरत गोदामात शिरली. गोदामाच्या आवारात पाणी पुरवठा योजनांच्या पाईप ठेवल्या होत्या. त्या पाईप ज्वलनशील असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. त्यात पाईप जळून खाक झाल्या. धुराचे लोट पाहिल्यानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. रत्नागिरी नगरपालिकेसह एमआयडीसीच्या अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण आणण्यात यश आले; परंतु तोपर्यंत गोदामातील एचडी पाईप जळून गेल्या होत्या. याप्रकरणी जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यात माहिती दिली होती. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. मात्र, आग कशामुळे लागली, याचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही.
नागरिकांकडून आगपाखड
जीवन प्राधिकरणाच्या कार्यालय परिसराची स्वच्छता ठेवली जात नाही. त्या कार्यालयाचीही दुरवस्था झालेली आहे. हा परिसर मोठा असून, तिथे गवत वाढलेले आहे, ते वेळेवर काढले जात नाही. परिसरात आजूबाजूला रस्त्यावर विविध वस्तू विक्री करणाऱ्या छोट्या-मोठ्या टपऱ्या आहेत. त्यामुळे गवतातून उडालेली ठिणगी आगीचे कारण होऊ शकते, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.