07851
खारेपाटण हायस्कूलमध्ये
‘ओपन जिम’चे लोकार्पण
तळेरे, ता. १ : खारेपाटण हायस्कूल येथील बालोद्यानमध्ये ग्रामपंचायतीच्या १५ वित्त आयोग निधीतून सुमारे १ लाख रुपये खर्च करून बनविण्यात आलेल्या ‘ओपन जिम’चे लोकार्पण आज जिल्हा परिषद माजी बांधकाम व वित्त सभापती रवींद्र जठार यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष सरपंच प्राची ईसवलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उपसरपंच महेंद्र गुरव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य तृप्ती माळवदे, माजी सरपंच रमाकांत राऊत, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर ढेकणे, जयदीप देसाई, मनाली होणाळे, दक्षता सुतार, खारेपाटण पतसंस्थेचे संचालक संतोष पाटणकर, मनस्वी कोळसुलकर, राजेंद्र वरुणकर, सोसायटी संचालक विजय देसाई, इस्माईल मुकादम, मोहन पगारे, खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ शिक्षण संस्थेचे सचिव महेश कोळसुलकर, खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डी. कांबळे, हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, देवानंद ईसवलकर, शेखर शिंदे, प्रणय गुरसाळे, शेखर कांबळी उपस्थित होते.
---
०७८५०
खारेपाटण बुद्धविहारला मदत
तळेरे, ता.१ : खारेपाटण गाव महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष तथा युवा कार्यकर्ते प्रणय गुरसाळे यांनी आपले वडील प्रकाश गुरसाळे यांच्या स्मरणार्थ खारेपाटण पंचशीलनगर येथील बुद्ध विहारासाठी स्टील कपाट भेट दिले. याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. प्रणय गुरसाळे यांच्या पत्नी अंकिता गुरसाळे, आई संगीता गुरसाळे उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला पंचशील विकास मंडळ खारेपाटणचे माजी अध्यक्ष संतोष पाटणकर, मंडळाचे सचिव सागर पोमेडकर, ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर पाटणकर, युवा कार्यकर्ते श्रवण पाटणकर, ललित पाटणकर, आशिष पोमेडकर यांसह संघमित्रा महिला मंडळ खारेपाटणच्या सचिव स्निग्धा पोमेडकर, महिला मंडळाच्या माजी अध्यक्षा आकांक्षा पाटणकर, सायली तुरळकर, अंगणवाडी सेविका सविता पाटणकर, मदतनीस सुनीता शेवडे, नम्रता जुमलेकर उपस्थित होते. यावेळी गुरसाळे कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.