कोकण

खारेपाटण केंद्रशाळेला चॅम्पियनशिप

CD

07855
खारेपाटण ः केंद्रस्तरीय बाल, कला, क्रीडा स्पर्धेचे उद्‍घाटन सरपंच प्राची इस्वलकर यांच्या हस्ते झाले.

खारेपाटण केंद्रशाळेला चॅम्पियनशिप

केंद्रीय क्रीडा महोत्सव; विजेत्यांची प्रभागस्तरासाठी निवड

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १ : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्राथमिक शालेय शिक्षण विभागातर्फे नुकत्याच खारेपाटण येथे घेतलेल्या केंद्रस्तरीय बाल कला, क्रीडा, ज्ञानी मी होणार क्रीडा महोत्सवामध्ये खारेपाटण केंद्रशाळा क्र. १ च्या विद्यार्थ्यांनी चॅम्पियनशिप प्राप्त केली. सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करण्यात येत आहे.
खारेपाटण केंद्रशाळा येथे झालेल्या क्रीडा महोत्सवाचे उद्‍घाटन सरपंच प्राची ईसवलकर यांच्या हस्ते झाले. या स्पर्धांमध्ये खारेपाटण केंद्रातील एकूण ९ शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये लहान गट ः ५० मीटर धावणे-अनन्या चौरे (द्वितीय), लांब उडी-श्रवण सूरज मोरे (द्वितीय), उंच उडी-हर्ष कानडे (प्रथम), प्रवीण मिनके व वैष्णवी निमणकर (द्वितीय). सांघिक खेळामध्ये कबड्डी, खो-खो मुले-मुली या दोन्ही संघांनी प्रथम क्रमांक, तर ५०x४ रिले स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
मोठा गट ः १०० मीटर धावणे-सुप्रबुद्ध पाटणकर (प्रथम), मुलींमध्ये सांची पाटणकर (द्वितीय). २०० मीटर धावणे-अथर्व लाड (प्रथम), सार्थक पोरे (द्वितीय), मुलींमध्ये शर्वरी देवस्थळी (द्वितीय), लांब उडी-अथर्व लाड (प्रथम), जय धामापूरकर (द्वितीय), मुलींमध्ये जान्हवी जाधव (द्वितीय), उंच उडी-सार्थक पोरे (प्रथम), प्रेम मिनके (द्वितीय), मुलींमध्ये स्वरा तोडकर (प्रथम), गोळाफेक-हेमंत गारगुंडे (प्रथम), सम्यक पाटणकर (द्वितीय), मुलींमध्ये वैष्णवी कोळसुलकर (प्रथम). याबरोबरच कबड्डी आणि खो-खो या खेळांमध्ये मुलगे व मुली या दोन्ही संघांनी प्रथम क्रमांक, समूहनृत्य स्पर्धेत मोठ्या गटात विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. या सर्व विद्यार्थ्यांची तळेरे प्रभागस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये निवड झाली. मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा झाली. संदीप कदम, राजेश तेरवणकर यांनी क्रीडा अधिकारी म्हणून काम पाहिले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्राप्ती कट्टी, माजी अध्यक्ष संतोष पाटणकर, ग्रामपंचायत सदस्य गुरुप्रसाद शिंदे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य मंगेश गुरव, प्रियंका गुरव यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women Employees: महिला कर्मचाऱ्यांसाठी गेम-चेंजर निर्णय! ‘लवकर या-लवकर जा’ योजना जाहीर; लाभ कसा घेता येणार?

Pune Crime : बनावट सोन्याची बिस्किटे दाखवून महिलांची फसवणूक; आरोपीकडून १२ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

स्टार प्रवाहची नवी मालिका 'बाई तुझा आशीर्वाद'चा प्रोमो समोर; ईशा केसकर नाही 'ही' अभिनेत्री साकारतेय मुख्य भूमिका

Navi Mumbai: पोलिसांचा गुन्हेगारांना दे धक्का! अवैध कारभाराविरुद्ध १४ आरोपींवर गुन्हे दाखल; घणसोलीत धडक कारवाई

Ajit Pawar News: V.K. सिंह यांचं अंडरवर्ल्डशी संबंध, मिटकरींकडे कोणते पुरावे?

SCROLL FOR NEXT