कोकण

वेंगुर्ले पालिकेसाठी दुपारपर्यंत शांततेत मतदान

CD

08050
वेंगुर्ले ः प्रभाग पाचमध्ये मंगळवारी कुबलवाडा येथे दिव्यांग व्यक्तींनी मतदान केले.
08056
वेंगुर्ले ः येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी नागरिकांनी केलेली गर्दी.


वेंगुर्ले पालिकेसाठी दुपारपर्यंत शांततेत मतदान

प्रशासनाकडून चोख बंदोबस्त; ज्येष्ठांसह दिव्यांगांचेही उत्स्फूर्तपणे मतदान

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २ ः येथील पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज झालेल्या मतदान प्रक्रियेत दुपारी दीड वाजेपर्यंत ४१.९७ टक्के एवढे मतदान झाले. सकाळपासून दुपारपर्यंत मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरू होती.
आज सकाळी साडेसातला मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला. शहरातील शाळा क्रमांक २ आणि भटवाडी शाळा क्रमांक १ या मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी दिसून आली. सकाळी साडेसात ते दुपारी साडेअकरापर्यंत २५.२ टक्के, तर दीड वाजेपर्यंत ४१.९७ टक्के मतदान झाले. यात २०७१ पुरुष तर २१७४ स्त्री मिळून एकूण ४२४५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. यात सामान्य मतदारांसोबतच ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींनीही उत्स्फूर्तपणे मतदान केले. दरम्यान, पालकमंत्री नीतेश राणे, भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी भाजपच्या येथील मतदान बूथवर भेटी देत आढावा घेतला. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, तालुकाध्यक्ष पपू परब यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पोलिस प्रशासनातर्फे उपविभागीय पोलिस अधिकारी श्वेता खाडे यांनी शहरातील मतदान केंद्रांवर भेटी देऊन मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला. यावेळी वेंगुर्ले पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Israel War मुळे भारतात दारूचा दुष्काळ? उन्हाळ्यात थंड बिअरही मिळणार नाही? उत्पादनावर काय परिणाम होणार

IPL 2026: 'रोहित शर्मा डगआऊटमधून २० ओव्हर पाहू शकत नाही, त्याला...', माजी क्रिकेटरचा मुंबई इंडियन्सला स्पष्ट सल्ला

Gudhipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

Latest Marathi News Live Update : पुण्यात पिरंगुट घाटात कार दरीत कोसळली

Kolhapur Headmaster Tragedy : निलंबनाचे नैराश्य मुख्याध्यापकाने थेट आंब्याच्या झाडाला घेतला गळफास, कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT