08122
फासकीत अडकलेला बिबट्या
खारेपाटण परिसरामध्ये जेरबंद
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २ : खारेपाटण संभाजीनगर स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यानजीक लावलेल्या फासकीत बिबट्याला वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुखरूप पिंजऱ्यात जेरबंद केले.
फासकीत बिबट्या अडकल्याची माहिती खारेपाटण उपसरपंच महेंद्र गुरव यांनी वनविभागाला दिली. सावंतवाडी उपवनसंरक्षक मिलिश शर्मा, सहाय्यक वनसंरक्षक सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली वनक्षेत्रपाल सुहास पाटील, पशुधन विकास अधिकारी सारिका दहिफळे यांनी खारेपाटण येथे जाऊन बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केले. यात वनपाल धुळू कोळेकर (फोंडा) श्रीकृष्ण परीट (देवगड), वनरक्षक सुखदेव गळवे, विजय भोसले, प्रशांत कांबळे, शुभम पाटील, अंकुश माने, स्वाती व्हनवाडे, रोहित सोनगेकर, रामदास घुगे, वाहनचालक सागर ठाकूर, जलद कृती दल सदस्य रिध्देश तेली, मयूर राणे, नीलेश मोरये तसेच सरपंच खारेपाटण प्राची इस्वलकर, ग्रामस्थ सागर खांडेकर यांनी सहकार्य केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.