कोकण

‘जिनिअस’ व्हायचंय? तर ‘एआय’ वापरा

CD

08194

‘जिनिअस’ व्हायचंय? तर ‘एआय’ वापरा

प्रणय तेली ः पणदूर वेंगुर्लेकर महाविद्यालयात ‘टेक रेक्स २५’

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३ ः एआय तंत्रज्ञानाचा सकारात्मकतेने वापर करून भविष्यात जिनिअस होण्यासाठी दिवसातील किमान आठ तास आवडत्या विषयात लक्ष केंद्रित करा. रोज काही ना काही शिकत राहा आणि आयुष्यभर विद्यार्थी राहा, असा संदेश नोबल कॉम्प्युटरचे संचालक प्रणय तेली यांनी विद्यार्थ्यांना दिला.
पणदूर येथील पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालयाच्या आयटी, सीएस विभागांद्वारे तंत्रज्ञानाची आवड असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी नुकतेच ‘टेक रेक्स २५’ उपक्रमाचे महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजन केले होते. दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे सचिव डॉ. अरुण गोडकर यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. या कार्यक्रमास श्री. तेली व सई तेली हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सीकॉम. डिजिटल मार्केटिंग कंपनी अँड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनीचे चंदन बागवे, महाविद्यालयाचे देणगीदार व उद्योजक अभिजित परब (कुडाळ) यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मुंबई हल्ल्यातील शहिदांना आदरांजली वाहिली. संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. या तांत्रिक महोत्सवात विद्यार्थ्यांसाठी ट्रेजर हंट, बी.जी.एम.आय., बॅटल रॉयल, कोड-डीकोड, क्विझ क्वेस्ट, रील मेकिंग, फोन फोटोग्राफी आदी स्पर्धा घेतल्या. त्याला विद्यार्थ्यांचाही मोठा प्रतिसाद मिळाला. स्पर्धांचा निकाल असा ः बी.जी.एम.आय. स्पर्धा-श्रेयस पोटभरे व टीम (कनिष्ठ महाविद्यालय पणदूर तिठा), सिद्धेश चव्हाण व टीम (कणकवली कॉलेज, कणकवली). रील मेकिंग स्पर्धा-अमेय कालेकर (तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय, पणदूर तिठा), अथर्व कालेकर आणि श्रेयस पोटभरे (तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय, पणदूर तिठा), फोटोग्राफी-तन्मय गोसावी (तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय, पणदूर तिठा), अमेय कालेकर (तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय, पणदूर तिठा), क्विझ-मितेश चव्हाण (पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय, पणदूर). कोड-डीकोड स्पर्धा-संजना नलावडे (पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय, पणदूर), ट्रेजर हंट-एस.वाय.बी.बी.आय. पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय, पणदूर यांनी यश संपादन केले. विजेत्यांना संस्था सचिव डॉ. अरुण गोडकर, प्रा. राजेंद्र पवार यांच्या हस्ते सन्मानित केले. या कार्यक्रमास प्रा. राजेंद्र पवार, कार्यक्रम समन्वयक प्रा. नागेश पालव, प्रा. उमा सावंत यांचे सहकार्य लाभले. पूर्वा मेस्त्री हिने सूत्रसंचालन केले. मयुरी चिंदरकर आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune-Nashik Railway : रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती: पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरू होणार; पहिल्या टप्प्यात ८,९७० कोटींचा खर्च

Excise Law: सिगारेटसह पान मसाल्याच्या किमती वाढणार! लोकसभेत मोठा निर्णय; हे विधेयक का आणले गेले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील सर्व शाळा उद्या बंद

Malegaon News : घरकुल लाभार्थ्यांचे सुमारे सहा कोटी रुपये थकले; प्रधानमंत्री आवास योजनेचे अनुदान हिशोब विभागाच्या दिरंगाईमुळे रखडले

Viral Video: 'सनम तेरी कसम...' गाण्यावर डान्स करणाऱ्या नव वधु-वराचा व्हिडिओ तुफान व्हायरल, यूजर्सच्या मजेदार कमेंटचा पाऊस

SCROLL FOR NEXT