कोकण

मोबाईलच्या दुष्परिणामाचे वास्तव दाखविणारे अनपेक्षित

CD

-rat३p६.jpg-
२५O०८१९०
रत्नागिरी- राज्य नाट्यस्पर्धेत श्री लक्ष्मीकांत विविध कार्यकारी को. ऑप. सोसायटी, भाटये या संस्थेने केलेल्या ‘कांचनमृग’ या नाटकातील एक क्षण. (नरेश पांचाळ ः सकाळ छायाचित्रसेवा)
----
मोबाईलच्या दुष्परिणामाचे ‘अनपेक्षित’ वास्तव
लक्ष्मीकांत कार्यकारी सोसायटीचे सादरीकरण ; रसिकांची दाद
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ः मोबाईलच्या जगात माणूस जवळ आला; मात्र मोबाईल, सोशल मीडियामुळे होणारे दुष्परिणामही दिवसेंदिवस वाढत आहेत. फसवणूक, विविध आमिषे, धमक्या या त्यातील मोठ्या समस्या; त्यातही वाढ झाली आहे. सोशल मीडियामुळे संवादाचे साधन झाले असले तरीही दुसऱ्या बाजूला ऑनलाईन संवादातून माणसाला मरणाच्या दारात नेऊन ठेवण्याचे प्रकार घडत आहे. याचं उत्तम उदाहरण राज्य नाट्यस्पर्धेत श्री लक्ष्मीकांत विविध कार्यकारी को. ऑप. सोसायटी भाट्ये या नाट्यसंस्थेने रसिकांना दाखवून दिले. लेखक-दिग्दर्शक नीलेश जाधव यांच्या संकल्पनेतून उतरलेल्या ‘अनपेक्षित’ नाटकाला रसिकांनी दाद दिली. येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात हा प्रयोग सादर झाला.
----
जीवनात मोबाईल ही अत्यावश्यक बाब झाली असली तरी माणसाच्या जीवनप्रवासात अनवधानाने म्हणा; पण अनेक अडचणी निर्माण केल्या आहेत. अगदी माणूस माणसाला खात असल्याचेही प्रकार उघड होत आहेत. कुटुंबातील सदस्य मरणप्राय यातना सोसण्याची कथा ‘अनपेक्षित’ या नाटकाच्या संहितेतून मांडली आहे. संहितेतील विषयातून लोकांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. चाळीतील तीन कुटुंबात मोबाईलमुळे घडणारे वास्तव दाखवण्यात आले आहे.
अजिंक्य, त्याचे वडील आणि विकास पाटील यांची मुलगी निहारिका. अनिकेत आणि त्याचे मम्मी-पप्पा, राजेश, अमेय, प्रणय असे तीन चाळकरी. महाविद्यालयीन तरुण अजिंक्य मोबाईलमुळे फसवणूक करणाऱ्या मुलींच्या जाळ्यात अडकतो. त्याचे वडील पोलिसखात्यात असतात तर काका विकास पाटील हे त्याच्या वडिलांचे चांगले मित्र असतात. अजिंक्य अचानक भयावह स्थितीत वागू लागतो. वडिलांना त्याचे वागणे पटत नाही. एके दिवशी विकास पाटील यांची मुलगी निहारिका अजिंक्यच्या घरी येते. त्या वेळी अजिंक्य तिला मनाला न पटणारा स्पर्श करतो. निहारिका हे वडिलांना सांगते. विकास पाटील-निहारिका घरी येतात त्या वेळी अजिंक्यचा हा प्रकार उघड होतो. अजिंक्यचे वडील त्याचा फोन घेऊन बघतात तर त्याच्या अकाउंटला २० ते २५ हजाराची रक्कम जमा झालेली असते. त्या रॅकेटचा अजिंक्यला सारखा फोन येत असतो. त्यामुळे अजिंक्य भयभीत होतो. त्याचे वडील मोबाईलवरून त्या रॅकेटमधील म्होरक्याला समजावतात, पैसे परत करतो म्हणून सागंतात; पण ते शक्य होत नाही.
इकडे अनिकेत उत्तम नृत्य करणारा असतो. त्याचे स्ट्रगल सुरू असते. त्याच्याकडे मोबाईल नसतो; पण वडील मोबाईलमुळे एका महिलेच्या जाळ्यात अडकतात. ती पैशाची मागणी करते. त्यामुळे हे कुटुंबही नैराश्येत दिवस घालवत असते. तिसऱ्या कुटुंबातील अमेय काका व प्रणयचा मामा हे मोबाईल रॅकेटमधील मुलीच्या जाळ्यात अडकतात आणि आत्महत्या करतात.
इकडे अक्षय, जॉय डिसोजा या रॅकेटमधील म्होरक्या राजेशला पकडण्यासाठी जंग जंग पछाडतात. शेवटी एका गार्डनमध्ये डब्बा खात असताना जॉय डिसोजा म्हणजेच इन्स्पेक्टर सुशांत गायकवाड आणि अक्षय हवालदार आणि अजिंक्यचे वडील या रॅकेटमधील राजेशला पकडतात. राजेशही परिस्थितीशी झगडत असतो. झटकन मोठे होण्यासाठी मोबाईलचा वापर करून लोकांना आमिषे दाखवून मुलींचा वापर करून दिवसाला २५ हजार मिळवत असल्याचे सांगतो, अशी कथा या अनपेक्षित नाटकात साकारण्यात आली तसेच मोबाईलमुळे होणारे दुष्परिणाम दाखवण्यास संस्था यशस्वी झाली.
---
सूत्रधार आणि साहाय
नेपथ्य ः नीलेश जाधव, गीतकार ः अनिकेत मोरे, संगीतः रोहित कांबळे, प्रकाशयोजना ःअक्षद मालेगावकर. वेशभूषा ः मयुरा जाधव. रंगभूषा ः रोहित कांबळे.
--------
पात्र परिचय
अजिंक्य ः गणेश राजेशिर्के, अजिंक्यचे वडील ः योगेश पाटील, विकास पाटीलः डॉ. प्रदीप निंदेकर, अनिकेत ः अनिकेत मोरे, अनिकेतचे पप्पा ः नितीन म्हापसेकर, अनिकेतची मम्मी ः मयुरा जाधव, राजेश ः विवेक शिंदे, अमेय ः अमेय हळदे, प्रणय ः प्रणय हळदे, निहारिका ः भूमिका अंगवलकर, अक्षय ः विनायक निवळकर, जॉय डिसोझा ः नीलेश जाधव.
----------
आजचे नाटक
नाटक ः तृतीयपंथी पुरुष. सादरकर्ते ः सम्राट फाउंडेशन. स्थळ ः स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी. वेळी ः सायंकाळी ७ वाजता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune-Nashik Railway : रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती: पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरू होणार; पहिल्या टप्प्यात ८,९७० कोटींचा खर्च

Excise Law: सिगारेटसह पान मसाल्याच्या किमती वाढणार! लोकसभेत मोठा निर्णय; हे विधेयक का आणले गेले?

Latest Marathi News Live Update : पनवेलजवळ मालगाडीचे रुळावरून घसरण्याचे प्रकरण!

Malegaon News : घरकुल लाभार्थ्यांचे सुमारे सहा कोटी रुपये थकले; प्रधानमंत्री आवास योजनेचे अनुदान हिशोब विभागाच्या दिरंगाईमुळे रखडले

Viral Video: 'सनम तेरी कसम...' गाण्यावर डान्स करणाऱ्या नव वधु-वराचा व्हिडिओ तुफान व्हायरल, यूजर्सच्या मजेदार कमेंटचा पाऊस

SCROLL FOR NEXT