-rat३p२४.jpg-
२५O०८२७९
चिपळूण ः वाशिष्ठी नदीत नव्याने साचलेला गाळ.
---
वाशिष्ठी नदीतील गाळकाढणीचा खेळखंडोबा
यंत्रणेसह निधीची कमतरता; डंपर, पोकलेन पश्चिम महाराष्ट्रात, राजकीय दबावाची चर्चा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३ ः वाशिष्ठी नदीतील गाळकाढणी ही कामे पावसाळ्यानंतर तातडीची असतानाही जलसंपदा विभाग आणि स्थानिक प्रशासनाची निष्क्रियता उघड झाली आहे. नागरिकांनी वर्षभर मागणी करूनही कामाला गती मिळत नाही. यंत्रसामग्री नाही, निधी नाही आणि झालंच तर राजकीय दबावामुळे यंत्रणा इतर ठिकाणी पाठवली जाते, असा आरोप नागरिकांकडून होत आहे.
गाळ काढणीसाठी तीन टप्पे निश्चित करण्यात आले; मात्र कामाचे नियोजन आणि अंमलबजावणी पूर्णपणे गोंधळलेली आहे. ज्या भागातील गाळ काढला जातो तेथे काही महिन्यांतच पुन्हा गाळ साचतो. तरीही विभाग वर्षानुवर्षे त्याच चुका करत राहिला आहे. वेळेवर निधी मिळत नसल्याने काम सुरू व्हायला उशीर होतोच; गेल्या वर्षी मेपासून मागणी असूनसुद्धा काम नोव्हेंबरपर्यंत सुरूच झाले नाही. गाळ काढणीसाठी मागवलेले १५ डंपर आणि चार पोकलेन पश्चिम महाराष्ट्रात पाठवण्यात आले आणि नंतर कधीच परत आले नाहीत. नागरिकांनी आवाज उठवल्यानंतरही विभागाकडून आश्वासनेच मिळाली; प्रत्यक्षात काहीच झाले नाही.
परिणामी, वाशिष्ठी नदीतील गाळ काढणीचे काम वर्षानुवर्षे रखडत राहिले आहे. निधी, नियोजन आणि यंत्रणाअभावी नागरिकांच्या समस्या वाढत चालल्या आहेत. प्रशासन व राजकारण्यांच्या आश्वासनांवर केवळ धूळफेक केली जात असल्याची तीव्र नाराजी जनतेत व्यक्त होत आहे.
-----
चौकट
पोकलेनचा प्रस्ताव पाठवलेलाच नाही
चिपळूणचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेतल्यानंतर शिवनदीतील गाळ काढणीसाठी २० लाखांचा निधी देण्याचे सांगण्यात आल्याचे जाहीर झाले. तसेच मोठ्या आकाराचे पोकलेन घेण्यासाठी पालिकेने प्रस्ताव पाठवावा, असेही सांगण्यात आले; परंतु पालिकेची दिरंगाई येथेही कायम असून, तो प्रस्ताव अद्याप पाठवला गेलेलाच नाही.
---
कोट
वाशिष्ठी नदीतील गाळ काढणे हे उत्सवासारखे होता कामा नये. यावर्षी गाळ काढण्याचे योग्य नियोजन व्हायला हवे. पालकमंत्री उदय सामंत, प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी यामध्ये लक्ष घालावे. शासनाकडून वेळेवर पैसे येत नसतील किंवा गाळ काढण्यासाठी शासनाकडे पैसे नसतील तर लोकसहभागातून हे काम करावे.
--अरुण भोजने, माजी नगरसेवक, चिपळूण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.