-rat५p१.jpg-
२५O०८५७२
वेदा सरफरे
---
जलक्रीडेत २१ महिन्याच्या वेदा सरफरेचा पराक्रम
१० मिनिटांत १०० मीटर अंतर कापले ; इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून दखल
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ : अवघ्या १ वर्ष ९ महिने (२१ महिने) वयाच्या वेदा सरफरे या चिमुकलीने जलक्रीडा क्षेत्रात विक्रमी कामगिरी नोंदवत राष्ट्रीय स्तरावर आपली मोहोर उमटवली आहे. तिने केवळ १० मिनिटांमध्ये १०० मीटर अंतर पोहून एक अविश्वसनीय पराक्रम केला आहे. तिच्या या विक्रमाची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली असून, तिची नोंद सर्वात कमी वयाची जलतरणपटू म्हणून झाली आहे. ती रत्नागिरी येथील सुप्रसिद्ध महेश मिलके स्विमिंग ग्रुपची विद्यार्थिनी आहे. तिने केवळ ११ महिन्यांच्या कठोर आणि सातत्यपूर्ण प्रशिक्षणानंतर हे अविश्वसनीय यश संपादन केले आहे. तिला या विक्रमी कामगिरीसाठी राष्ट्रीय जलतरणपटू, राष्ट्रीय प्रमाणपत्र प्राप्त प्रशिक्षक व जिल्हा क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारप्राप्त महेश मिलके आणि गौरी मिलके यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या अथक परिश्रमामुळेच वेदासारख्या चिमुकलीने इतक्या लहान वयात राष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख निर्माण केली आहे. वेदा ही ऐतिहासिक नोंद रत्नागिरीच्या क्रीडा नकाशावर एक नवा ‘माईलस्टोन’ ठरली असून, इतर चिमुकल्यांनाही जलक्रीडेकडे आकर्षित करण्यासाठी ती नक्कीच प्रेरणास्रोत ठरणार आहे.