कोकण

निखिल बावकर यांचा सावंतवाडीत सत्कार

CD

08820

निखिल बावकर यांचा सावंतवाडीत सत्कार
सावंतवाडी, ता. ६ ः येथील उपजिल्हा रुग्णालयात २४ तास एक्स-रे तंत्रज्ञ म्हणून उत्कृष्ट सेवा बजावणारे निखिल बावकर यांची कुडाळ ग्रामीण रुग्णालयात बदली झाली. त्यांच्या या सेवाभावी कार्याची दखल घेऊन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून त्यांना पुष्प व भेटवस्तू देऊन पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सावंतवाडी रुग्णालयामध्ये आठ महिन्यांपासून एक्स-रे तंत्रज्ञ म्हणून बावकर यांनी रुग्णांना उत्कृष्ट सेवा दिली. सामाजिक बांधिलकीच्या सेवाभावी कार्यामुळे ते काही दिवसांतच संस्थेचे चांगले मित्र बनले. त्यांची बदली कुडाळ ग्रामीण रुग्णालयात झाली आहे. त्यांनी दिलेल्या सेवेबद्दल प्रतिष्ठानतर्फे त्यांचा सत्कार केला. यावेळी प्रतिष्ठानचे सदस्य रवी जाधव व लक्ष्मण कदम तसेच मनोज सावळे, इसीजी तंत्रज्ञ सुप्रिया नाईक, कॅच्युलिटी इन्चार्ज सिस्टर, डॉ. क्रांती, डॉ. प्रिया, डॉ. सिद्धेश्वर, शुभांगी कट्टीकर, प्रथमेश परब, सिटीस्कॅन तंत्रज्ञ, कांचन कुंडईकर आदी उपस्थित होते. येथील रुग्णालयात बावकर यांच्या जागी नवीन एक्स-रे तंत्रज्ञ आसिफ सनदी यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांचेही स्वागत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी केले.
.......................
08823
वेदांत पाटकर, पीयूष परब

तळवडे इंग्लिश स्कूलचे प्रश्नमंजुषेत यश
मळेवाड, ता. ६ ः गुरुवर्य बी. एस. नाईक मेमोरियल ट्रस्ट संचालित इंग्लिश मीडियम स्कूल, तळवडेच्या विद्यार्थ्यांनी ५३ व्या सावंतवाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात यश प्राप्त केले. या प्रदर्शनाअंतर्गत आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहावी ते आठवी या गटात प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूलमध्ये झालेल्या या स्पर्धेत आठवीतील वेदांत पाटकर, तर सातवीतील पीयूष परब या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेच्या विज्ञान शिक्षिका प्रियांका गावडे, सुखदा कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल प्रशालेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मैथिली नाईक, मुख्याध्यापक अजय बांदेकर यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NED, T20 WC: टीम इंडियाचा विजयी चौकार! नेदरलँड्सने दिली कडवी झुंज; आता Super 8s मध्ये भारतासमोर ३ तगडे संघ

मोठी बातमी! उजनीतून सोडलेले पाणी कर्नाटकने आडविले, दक्षिण सोलापूरमधील शेती, गावे तहानली; तरीपण जलसंपदामंत्री विखे पाटील कॉल उचलेनात, वाचा...

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपींनी दिला कबुलीजबाब!

Dumper Accident : भरधाव डंपरची आठ वाहनांना धडक; कात्रज ते वडगावदरम्यान महामार्गावर थरार

Mangalwedha News : 1650 अल्पभूधारक शेतकऱ्यांना मनरेगा योजनेचा लाभ देण्याची सुनंदा आवताडे यांची भरत गोगावले यांच्याकडे मागणी

SCROLL FOR NEXT