कोकण

-चिपळूण-गुहागर रस्त्यावरील प्रवास धोकादायक

CD

-rat६p८.jpg-
२५O०८८५२
चिपळूण ः चिपळूण-गुहागर मार्गावर वाढलेली झाडी.
----
‘चिपळूण-गुहागर’वरील प्रवास धोकादायक
झाडी, खड्ड्यांमुळे चालक हैराण; पर्यटकांमध्ये नाराजी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ६ : चिपळूण तालुक्याला लागून गुहागर हा समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे याकडे पर्यटकांची ओढ व ओघ जास्त आहे; परंतु या तालुक्याकडे जाणारा रस्ता खूप खराब तर आहेच शिवाय रस्त्यावर आलेली झाडीझुडापे व गवत यामुळे टू व्हीलर, रिक्षाने प्रवास करणे धोकादायक ठरत आहे.
गुहागर हे पर्यटनक्षेत्र असल्यामुळे येथे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते आणि येथे पोहोचण्यासाठी चिपळूण-गुहागर हाच मुख्य रोड आहे; परंतु याच रस्त्यावर गवत, झाडी रस्त्यावर आल्यामुळे प्रवास भीतीदायक ठरत आहे. झाडीझुडपांमुळे मुळ रस्ता अरुंद त्यातच धोकादायक वळणे यामुळे प्रवास जीवघेणा होत आहे. रस्त्यावर वाहनांची गर्दी त्यातच वाहनांचा भरधाव वेग यामुळे लहान वाहनांसाठी धोकादायक व प्रवाशांच्या जिवाशी खेळण्यासारखे आहे.
पर्यटनास चालना देण्यासाठी रस्ता रुंदीकरण व काँक्रिटीकरण करण्याचा शासनाने निर्णय घेतला; पण गेल्या पाच वर्षात जेमतेम गुहागर ते रायपूरपर्यंतचे काम रखडत पूर्ण झाले. रामपूर ते चिपळूण शहरापर्यंतच्या कामात अजिबात प्रगती नाही त्यातच जुन्या मूळ रस्त्यावर आलेली झाडी, गवत यामुळे असा जीवघेणा प्रवास करावा लागतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday : पुढील आठवड्यात कधी असणार बँकांना सुट्टी? ; जाणून घ्या, महत्त्वाची माहिती अन्यथा खोळंबतील कामे

चार हजार मीटर खोल समुद्रात १६० दिवस राहिले वैज्ञानिक; प्रशांत महासागरात जे दिसलं त्याने सगळेच हादरुन गेले

इंदू मिल स्मारकाबाबत मोठी अपडेट! डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम कधी पूर्ण होईल? मुख्यमंत्र्यांनी तारीखच सांगितली

IND vs SA 3rd ODI: जैस्वालचं शतक अन् विराट-रोहितची फिफ्टी; भारताने दणदणीत विजयासह द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Mercedes accident Video: भरधाव मर्सिडिज दुभाजकाला धडकून रॉकेटसारखी दोन कार वरून उडाली अन्...

SCROLL FOR NEXT