कोकण

वाढदिवसाच्या खर्चातून शाळेत दंत तपासणी शिबिर

CD

- rat७p३.jpg-
P२५O०८९९४
चिपळूण ः घाणेखुंट जिल्हा परिषद शाळेत आरोग्य साहित्य वाटप करताना जय भवानी मित्र मंडळाचे पदाधिकारी
---
वाढदिवसाच्या खर्चातून दंत शिबिर
तुषार खताते यांचा उपक्रम ; घाणेखुंट येथे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ८ ः जय भवानी मित्र मंडळ घाणेखुंटचे सदस्य आणि रोटरॅक्ट रत्नागिरी झोन अध्यक्ष तुषार खताते यांच्यावतीने वाढदिवसानिमित्त आदर्श शाळा घाणेखुंट नं. २ आणि उर्दू शाळा घाणेखुंट येथे दंत तपासणी शिबिर घेण्यात आले. यामध्ये विद्यार्थांची मोफत तपासणी करण्यात आली.
जय भवानी मित्र मंडळाचे सर्व सदस्य गेल्या काही वर्षांपासून वाढदिवस साजरा न करता त्या खर्चातून गावातील शाळांमध्ये एक वाढदिवस शाळेसाठी या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना विविध साहित्य उपलब्ध करून देत आहेत. तसेच शाळेच्या प्रगतीसाठी आवश्यक भौतिक सुविधाही निर्माण करत आहेत. विद्यार्थ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यावर त्यांचा भर आहे. मंडळाचे सदस्य तुषार खताते यांनी आपल्या वाढदिवसासाठी होणारा अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांसाठी मोफत दंत तपासणी शिबिर आयोजित केले होते. या शिबिरामध्ये योगिता दंत महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी विद्यार्थ्यांना दातांची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. ज्या विद्यार्थ्यांना दातांच्या समस्या आहेत, त्यांच्यावर दंत महाविद्यालयात उपचार केले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना मोफत टूथब्रश आणि टूथपेस्टचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच राजू ठसाळे, रोटरॅक्ट क्लब लोटेचे अध्यक्ष शुभम काते, जय भवानी मित्र मंडळ अध्यक्ष अनिकेत काते, विक्रम पवार आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाणी वाचवा! एक लीटर पाण्यात अंघोळ, RSSच्या स्वयंसेवकांना प्रशिक्षण देत असल्याचा VIDEO VIRAL

IPL 2026 Final, RCB vs GT live: अहमदाबादमध्ये रंगणार महामुकाबला! दुसऱ्या ट्रॉफीसाठी बंगळुरू-गुजरात आमने-सामने; कुठे अन् कधी पाहाणार मॅच?

Solapur Vidhansabha BJP: सोलापूर विधान परिषदेसाठी भाजपचा सस्पेन्स कायम; उमेदवारीवरून भाजपमध्ये चुरस, कोणाला मिळणार संधी?

Pune Medical College: दोन तासांचे काम; महिन्याचा दाम, पुण्यातील अटलबिहारी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्‍टरांचा अनोखा फंडा

"आमिर आणि माझ्या नात्याला नाव मिळालं नाही" पूजा भट्टचा धक्कादायक खुलासा; नात्याबद्दल म्हणाली..

SCROLL FOR NEXT