कोकण

-शिक्षिका भाग्यश्री जाधव यांची गोळाफेक राज्यस्तरासाठी पात्र

CD

rat७p२६.jpg-
P२५O०९१४१
कोल्हापूर : विभागीय स्पर्धेत राज्यस्तरासाठी पात्र शिक्षक खेळाडूंसमवेत मध्यभागी मंडणगडच्या शिक्षिका भाग्यश्री जाधव.
-
भाग्यश्री जाधव राज्यस्तरावर दाखल
क्रीडा स्पर्धेत यश ; गोठे शाळेचे उल्लेखनीय कामगिरी
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ८ ः कोल्हापूर शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षक, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेत गोठे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सहशिक्षिका भाग्यश्री जाधव यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. विभागीय स्तरावरील गोळाफेक महिला गटात त्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करत पाच जिल्ह्यातील २२ स्पर्धकामधून लक्षणीय यश संपादन करीत राज्यस्तरासाठी पात्रता मिळवली आहे. त्यांच्या या यशामुळे मंडणगड तालुका व गोठे शाळेचा गौरव वाढला आहे.
ही स्पर्धा कोल्हापूर येथे ६ डिसेंबरला झाली. भाग्यश्री जाधव यांनी यापूर्वी तालुका आणि जिल्हा स्तरावरील स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. सातत्यपूर्ण सराव, जिद्द आणि खेळातील प्रावीण्य यांच्या जोरावर त्यांनी विभागीय स्तरावरही प्रभावी कामगिरी करीत ७.४० मीटर लांब गोळा फेकून राज्यस्तरावर प्रवेश मिळवला. विशेष म्हणजे, गोठे शाळेतील सर्व तीन शिक्षकांनी या क्रीडा स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यामध्ये रजनी जाधव (पोस्टर मेकिंग), दिलीप मराठे (गायन), भाग्यश्री जाधव (गोळाफेक) तालुकास्तरावरील स्पर्धेत तिन्ही शिक्षकांनी प्रथम क्रमांक पटकावत गोठे शाळेची संघभावना आणि खेळाडूपणा अधोरेखित केला. याशिवाय मानसी भोये बोरखत शाळा (१०० मीटर धावणे), धोंडीबा ठेंगळ उन्हवरे दहीम्बें शाळा (१०० मीटर धावणे ) यांनी मंडणगड तालुक्याच्या वतीने या क्रीडा प्रकारात विभागातरावर प्रतिनिधित्व केले, मात्र त्यांना यशाने थोडक्यात हुलकावणी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Schedule: जेतेपदासाठी लढण्यास टॉप - ४ संघ सज्ज! कधी अन् कुठे रंगणार प्लेऑफचे सामने? नोट करून ठेवा

IPL 2026: मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थानने 'ती' चाल खेळली अन् पंजाब-कोलकाताचा गेम केला; कर्णधार रियान परागचा खुलासा

MI vs RR: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ धावांवर आऊट होऊनही घडवलाय इतिहास

IPL 2026 Final Points Table: अजिंक्य रहाणे लढला, पण KKR हरले! दिल्लीने शेवटचा सामना जिंकला अन् CSK ला टाकले मागे

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

SCROLL FOR NEXT