- rat८p१०.jpg-
५O०९२६४
चिपळूण ः मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण येथे सुरू असलेले उड्डाणपुलाचे काम.
- rat८p११.jpg-
P२५O०९२६५
पाली ः पाली येथे सुरू असलेले उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरू आहे.
----
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण--लोगो
महामार्गावरील तीन उड्डाणपुलांची कामे संथगतीने
सहा महिन्याची मुदत ; वारंवार घडतात अपघात, वेळेत काम करण्याचे आव्हान
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ८ : केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्ग एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती संसदेच्या हिवाळी अधिवेशनात दिली; मात्र संगमेश्वर, चिपळूण, पाली येथील उड्डाणपुलाच्या कामाची गती पाहता हे पूल पुढील सहा महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे या वेळचे आश्वासनही खोटे ठरण्याची शक्यता दिसत आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू असले तरी पुलांची कामे रेंगाळली आहेत. आरवली ते लांजादरम्यानचे काम अजूनही मुंगीच्या वेगाने सुरू आहे. चौपदरीकरण करताना जागोजागी वळवलेले रस्ते, मोठ्या पुलांच्या ठिकाणी असलेली धोकादायक स्थिती ‘जैसे थे’ असल्यामुळे ही कामे जीवघेणी बनली आहेत. ज्या ठिकाणी रस्त्याचे काम पूर्ण झाले तिथेही अजून डायव्हर्जन आहेत; मात्र त्या ठिकाणी दिशादर्शक फलक नाही. त्यामुळे वाहनांचे अपघात होत आहेत. काही दिवसांपूर्वी कापसाळ येथील ट्रॅव्हल्सला अपघात झाला. त्यात चालकाला मोठी दुखापत झाली. असे अपघात येथे वारंवार घडत आहेत; मात्र अपघात होऊ नये यासाठी उपाययोजना शून्य आहेत. त्यामुळे कामाची एकूण गती पाहता पुढील सहा महिन्यात हे काम पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे.
चिपळूणमध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. ते पुढील सहा महिन्यात पूर्ण होणे शक्य नाही. चिपळूण शहरातील सेवारस्त्यांवर अपघात टाळण्यासाठीच्या उपाययोजना झालेल्या नाहीत. रस्त्याला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. तेथील रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही. चिपळूणपासून पुढे हातखंबापर्यंत पुलांची कामे झाली आहेत. काही ठिकाणी अंडरपासही तयार करण्यात आले आहेत. पावसाळ्यात या अंडरपासवर पाणी साचते. आता पावसाळा संपला आहे. त्यामुळे अशा ठिकाणी उपाययोजना करण्याची गरज आहे. संगमेश्वर येथील उड्डाणपुलावर गर्डर चढवण्याचे काम सुरू आहे. हे काम जरी पूर्ण झाले तरी या पुलावर जाण्यासाठीचा रस्ता करेपर्यंत सहा महिन्यांचा कालावधी पुरणार नाही, अशी सद्यःस्थिती आहे. कारण, या पुलावर चढण्यासाठी लागणारा दोन्ही बाजूने भराव अजून करण्यात आलेला नाही. पाली येथील पुलावरील गर्डर चढवण्याचे काम सुरू झालेले नाही.
---
कोट
चिपळूणमध्ये उड्डाणपुलाचे काम करताना एका बाजूला गर्डर चढवणे आणि स्लॅबचे काम सुरू आहे त्याचबरोबर उड्डाणपुलाच्या ॲप्रोच रोडचे कामदेखील गतीने सुरू करण्यात आले आहे. दोन्ही बाजूंना ॲप्रोच रोडची भिंत आणि मध्ये भरावाचे काम वेगात सुरू झाले आहे. येत्या मार्च २०२६ अखेर उड्डाणपुलाचे काम पूर्ण करून वाहतूक सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
- श्याम खुणेकर, सहाय्यक अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, चिपळूण
-------
कोट
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम किती दर्जाचे झाले आहे, हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः प्रवास करून तपासले पाहिजे. मंत्र्यांचा दौरा असला की, ठेकेदार कंपनी अपघात होऊ नये यासाठी उपाययोजना करतात. आम्हाला तात्पुरती व्यवस्था नको कायमस्वरूपी व्यवस्था पाहिजे.
- नीलेश खापरे, नागरिक, असुर्डे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.