कोकण

दापोली तालुक्यात भरते बिन भिंतीची शाळा

CD

काही सुखद---लोगो

-rat८p९.jpg-
२५O०९२६२
दापोली ः जालगाव येथे आयोजित बिनभिंतीच्या शाळेत सहभागी विद्यार्थी.
-----
दापोली तालुक्यात भरते बिनभिंतीची निसर्गशाळा
‘निवेदिता प्रतिष्ठान- आम्रपाली’चा उपक्रम ; पर्यावरण संवर्धनाचा जागर, हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. ८ ः निसर्ग संवर्धन हा सध्याचा कळीचा मुद्दा आहे. सर्वत्र वृक्षकटाई आणि प्रदूषणाची स्पर्धा सुरू असतानाच दापोली तालुक्यात जालगाव येथे शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी बिनभिंतीची शाळा हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. निवेदिता प्रतिष्ठान आणि आम्रपाली होम स्टेच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात येत असून, त्या द्वारे पर्यावरण संवर्धन केले जात आहे.
याबाबत प्रकल्प प्रमुख डॉ. प्रशांत परांजपे म्हणाले, पर्यावरण विषय हा गुणांपुरता मर्यादित राहिल्यामुळे आणि पालकांपर्यंत त्याची जाणीवजागृती न झाल्यामुळे निसर्गाचा प्रचंड प्रमाणात ऱ्हास होत आहे. तो टाळून निसर्गरक्षण किती महत्त्वाचे आहे आणि सद्यःस्थिती किती गंभीर आहे, याची जाणीवजागृती करून देण्यासाठी या निसर्गशाळेचे अर्थात बिनभिंतीच्या शाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या शाळेमध्ये विविध महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी निसर्गाची तोंडओळख करून गेले आहेत. या शाळेमध्ये अनेक निसर्गप्रेमीही येऊन जात असतात. या शाळेमध्ये निसर्ग वाचायला शिकवले जाते. परिसरात असलेल्या वनस्पतींचे वनौषधी उपयोग आणि गमतीजमती सांगून वृक्षवल्ली याबाबतची आत्मीयता वाढवली जाते. या ठिकाणी कचऱ्यापासून केबिन बनवण्यात आली आहे. कचऱ्यापासून बेंचेस बनवण्यात आले आहेत, कचऱ्यावर आधारितच मचाण व शेतीचा प्रकल्प आहे. कर्करोगासारखा महाभयंकर आजार कसे आपण विकत घेऊन ते खातो आहोत ते प्रात्यक्षिकांसह दाखवून समाजाचे डोळे उघडण्याचे कार्य या माध्यमातून केले जात आहे.
कोकणातील ५० ते दीडशे वर्षे पूर्वीच्या पुराणवस्तूंचा परिचय करून देऊन इतिहास किती प्रगल्भ होता याची जाणीवजागृती करून देण्यात येते. त्याचप्रमाणे दापोली ते दिलेल्या महान रत्नांची ओळख या निसर्गशाळेत एकाच प्रकल्पात करून देण्यात येते.
------
चौकट
टाळी योगातून एनर्जी
शेकोटीच्या गप्पा, पोपटी पार्टी आणि कोणतेही साधनसामग्री न घेता एकाच वेळेला ५० ते १०० विद्यार्थी किंवा आलेल्या समूहातील नागरिकांना सामावून घेऊन नैसर्गिक खेळातून निसर्गानंद आणि धमाल मस्तीचा आनंद दिला जातो. टाळी योगातून एनर्जी दिली जाते. या संपूर्ण एक किंवा दोन दिवसाच्या निसर्गानंद आणि बिनभिंतीच्या शाळेचे आयोजन हे अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने केले जाते. त्यात विविध विषयाचे तज्ज्ञ हे मार्गदर्शक म्हणून लाभतात आणि ते मुलांचे होऊन जातात.
----
कोट
निसर्ग वाचायला शिकलो तरच निसर्ग वाचणार म्हणूनच ही बिनभिंतीची शाळा दापोली येथील जालगावमध्ये भरते आहे. याचा आनंद जास्तीत जास्त नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी घ्यावा आणि निसर्ग संवर्धनात प्रत्येकाने मोलाचा वाटा उचलावा.
- डॉ. प्रशांत परांजपे, जालगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Alert : जून-जुलैमध्येही उष्णतेची लाट कायम राहणार; माॅन्सून श्रीलंकेवरच रेंगाळला, 7 दिवसांत केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता, आयएमडीचा नवा अंदाज काय?

Pune News: हिंजवडीतील IT कंपनी अचानक बंद? पगार नाही, चेक बाऊन्स... ७०० इंटर्न आणि कर्मचाऱ्यांचा वेतन घोटाळा उघड

Abhishek Banerjee Attack : अभिषेक बॅनर्जींवर जीवघेणा हल्ला; विटा-दगडं फेकत डोळे आणि छातीवर वार, ममता बॅनर्जींचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाल्या, सत्ताधारी खुनी...

Hero New Bike : पेट्रोल पंपावर जायचं विसरा! लॉन्च झाली Hero ची दमदार बाइक; 72km मायलेजसह जबरदस्त स्मार्ट फीचर्स, किंमत फक्त...

Gokul Politics : बंटी पाटलांना टक्कर देण्यासाठी महायुतीचा 'मास्टरस्ट्रोक'! 'गोकुळ'साठी कोरेंची मध्यस्थी अन् चंद्रकांतदादांनी काढला तोडगा, गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT