कोकण

चिपळूण-सह्याद्री व्याघ्र प्रकल्प वाघांसाठी सर्वात पोषक

CD

O09540

rat९p१०.jpg
०९४९०
चिपळूणः मुशाफिर जंगलवाटांचे या कार्यक्रमात वनसंरक्षक तुषार चव्हाण यांची मुलाखत घेताना ओंकार बापट.
---------

मुशाफिर जंगलवाटांचे - लोगो

सह्याद्रीत ५० वाघ सहज नांदू शकतील
वनसंरक्षक तुषार चव्हाण; ९० बिबट्यांचा वावर, प्रत्येक वाघाला खास रेडिओ कॉलर लावणार
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ९ : सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात वाघाचे प्रमुख भक्ष्य असलेले गवा आणि सांबर मोठ्या प्रमाणात आहेत. पाण्याचे स्रोत मुबलक आहेत. संपूर्ण ११६५ चौ. हेक्टर किमी क्षेत्रात ५० वाघ सहज नांदू शकतील इतके भक्षक आणि भक्ष्य दोन्ही उपलब्ध आहे.‌ इतिहासात सह्याद्री भागात वाघांच्या शिकारीला परवानगी होती, याची उदाहरणे नोंदीत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे गेल्या काही दशकांत वाघसंख्या घटली आहे, असे मत सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्र संचालक व वनसंरक्षक तुषार चव्हाण यांनी व्यक्त केले.
(कै.) नीलेश बापट निसर्गकट्टाअंतर्गत सुरू झालेल्या ‌‘मुशाफिर जंगलवाटांचे‌’ या मुलाखतवजा अनुभवकथन मालिकेतील पहिल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ही त्यांची मुलाखत ओंकार बापट यांनी घेतली. हा उपक्रम वाईल्डलाईफ अनलिमिटेड चिपळूण आणि रत्नागिरी वनविभाग यांच्यावतीने तसेच ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्या सहकार्याने आयोजित केला होता. कार्यक्रमाचा प्रारंभ मार्कंडी येथील वनभवनमधील निसर्गसेवक (कै.) नीलेश बापट छायाचित्रदालनात झाला. सह्याद्रीतील निसर्ग, वाघांचे स्थलांतर, बिबट्यांची वाढती संख्या, परिसंस्थेतील बदल आणि वनविभागातील तरुणांसाठीच्या संधींबाबत चव्हाण यांनी सविस्तर संवाद साधला. सह्याद्री व्याघ्रप्रकल्पातील निसर्गवैभव, संपन्न जैवविविधता आणि भरपूर भक्ष्य प्राणीसंख्या यामुळे हे संपूर्ण क्षेत्र वाघांच्या मुक्त संचारासाठी अत्यंत पोषक आहे.

चौकट
तीन नर वाघ, शिल्लक वाघिणींची गरज
सध्या प्रकल्पात तीन वाघ असून, त्यात एकही वाघीण नाही त्यामुळे हे वाघ वाघिणींच्या शोधात भटकत आहेत. त्यामुळे प्रजनन थांबले आहे. वाघांची संख्या वाढवण्यासाठी महाराष्ट्रातील इतर भागांतून वाघिणी सह्याद्रीत आणण्याचे काम सुरू आहे. वाघिणींच्या आगमनानंतर त्यांचे आणि परिसरातील लोकांचे सुरक्षा प्रशिक्षण, मार्गदर्शन यासाठी विभागाकडून व्यापक योजना राबवण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वाघांच्या स्थानांतरणाबाबत चव्हाण यांनी सांगितले, प्रत्येक वाघाला खास रेडिओ कॉलर लावले जाते. त्यावरून त्यांची हालचाल, कुठे जातात, कुठे थांबतात याची अचूक माहिती मिळते. यामुळे वाघ नवीन क्षेत्रात गेल्यास तेथील लोकांना सावधानता दिली जाते.‌

चौकट
सह्याद्रीत ९० बिबटे, एआय जनरेटेड हल्ले
सह्याद्री परिसरात सध्या ९० बिबटे आहेत. बिबट्यांचा संघर्ष वाढतोय, असे म्हटले जाते; पण यामागे कारण माणूसच आहे. वस्तीमध्ये भटके कुत्रे असतात किंवा ते सोडले जातात, जे बिबट्याचे मुख्य भक्ष्य आहे. कुत्र्यांमागे बिबटे वस्तीपर्यंत येतात आणि मग त्यांना ‌‘बिबट्या हल्ला‌’ असा दोष दिला जातो. ही चूक थांबवणे गरजेचे आहे.‌ बरेचसे हल्ले एआय जनरेटेड असतात. त्यामुळे सोशल मीडियावरील अफवा धोकादायक आहेत. वाघ कधी कधी नजरेस पडतो; पण याचा अर्थ तो वस्तीवर हल्ला करणार, असा नसतो. वाघ दिसला की, लगेच व्हिडिओ-पोस्ट टाकून ‌‘वाघ आला आहे‌’ असे मेसेज व्हायरल केले जातात. हे अज्ञानामुळे पसरते आणि भीती निर्माण होते.‌

चौकट
वनक्षेत्रात तरुणांसाठी अमर्याद संधी
वनविभागात फक्त अधिकारीच नव्हे तर बायोडायव्हर्सिटी एक्स्पर्ट, वन्यजीव छायाचित्रकार, व्हेटरनरी डॉक्टर, संशोधक, स्वयंसेवक अशा अनेक मार्गांनी काम करता येते. निसर्गप्रेमी तरुणांना इथे मोठ्या प्रमाणात संधी आहे.‌

चौकट
निसर्गप्रेमींसाठी मूल्यवान कार्यक्रम
‌‘मुशाफिर जंगलवाटांचे‌’ या मालिकेत येत्या प्रत्येक महिन्यात नवनवीन जंगलप्रेमी, अधिकारी, अभ्यासक, फोटोग्राफर्स यांची अनुभवकथने चिपळूणकरांना ऐकायला मिळणार आहेत. या कार्यक्रमाला विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई, सहाय्यक वनाधिकारी प्रियंका लगड, रामशेठ रेडीज, डॉ. तेजानंद गणपत्ये, भाऊ काटदरे यांच्यासह चिपळुणातील निसर्गप्रेमी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: प्रेयसीचा मॅसेज आला अन् भेटायला गेला …; काही तासांतच आईला फोन, प्रेमसंबंधातून तरूणाला संपवलं, कोथरूडमध्ये काय घडलं?

LPG गॅस कमतरतेच्या अफवा वाढल्या अन् प्ले स्टोअरवर झाला धूमाकुळ; नंबर 1 डाउनलोडवर पोहोचले 'हे' ॲप, जाणून घ्या का वाढली डिमांड

पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

अरे व्वा! अनुष्का शेट्टी लवकरच करणार लग्न? वयाच्या 44 व्या वर्षी व्यावसायिकासोबत बांधणार लग्नगाठ?

Rasgulla Choking Death : लग्नात जेवताना घशात रसगुल्ला अडकल्याने मृत्यू, विचित्र घटनेने सगळेच हादरले; डॉक्टरांनी सांगितले नेमके कारण

SCROLL FOR NEXT