- rat१०p१६.jpg-
P२५O०९७३८
संगमेश्वर ः महमार्गावर धामणी येथे हवी निवाराशेड.
धामणी येथे प्रवाशांची गैरसोय
मुंबई-गोवा महामार्गावर निवारा शेडचा आभाव; बांधकाम विभाग लक्ष देणार का?
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १० ः मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असले तरीही, अनेक ठिकाणी प्रवाशांसाठी मूलभूत सुविधांचा अभाव दिसून येत आहे. याचाच प्रत्यय संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे येत आहे. जिथे निवाराशेड नसल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. परिणामी, संबंधित विभागाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन धामणी येथे तातडीने निवाराशेड बांधावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
धामणी आणि गोळवली या दोन गावांसाठी मध्यवर्ती ठिकाण म्हणून महामार्गावर धामणी येथ बसथांबा आहे. या दोन्ही गावातील नागरिक तसेच दररोज शाळेत ये-जा करणारे विद्यार्थी या ठिकाणी बसची वाट पाहण्यासाठी थांबतात. विशेषतः, संगमेश्वर, रत्नागिरी आणि देवरूखसारख्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवासी इथेच ताटकळत उभे राहतात. या ठिकाणाचे महत्त्व केवळ शालेय विद्यार्थ्यांसाठीच नाही, तर ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांसाठीही आहे. दवाखान्यात जाण्यासाठी अनेक ज्येष्ठ नागरिक याच ठिकाणी बसची वाट पाहत उभे राहतात. निवाराशेड नसल्यामुळे बस येईपर्यंत त्यांना उन्हात आणि पावसाळ्यात उघड्यावर उभे राहावे लागते, ज्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होते. कडक उन्हात प्रवाशांना बसची वाट पाहावी लागते, ज्यामुळे उष्माघाताचा धोका संभवतो तसेच मुसळधार पावसात आसरा मिळत नसल्याने प्रवाशांना भिजत उभे राहावे लागते. धामणी येथील प्रवाशांची ही गंभीर समस्या तातडीने सोडवणे आवश्यक आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या संबंधित विभागाने या ठिकाणी त्वरित निवाराशेड बांधण्यासाठी योग्य त्या सूचना द्याव्यात जेणेकरून धामणी आणि गोळवली परिसरातील प्रवाशांना आणि विद्यार्थ्यांना लवकरच दिलासा मिळेल, अशी मागणी केली जात आहे.
----
कोट
गेली कित्येक वर्षे मुंबई-गोवा महामार्गावर चौपदरीकरणाची कामे चालू आहेत; परंतु ते काम कासवगतीने सुरू आहे. त्याचा फटका ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. संगमेश्वरमध्ये जायचं झालं तरीही धामणी येथील बसथांब्यावर उभे राहावे लागते. पाऊस असेल तर खूपच हाल होतात. आमदार शेखर निकम यांनी या विषयाकडे लक्ष देऊन त्वरित निवाराशेड बांधण्याचे आदेश द्यावेत.
- जयंत गमरे, ग्रामस्थ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.