कोकण

राजापूर-येरडवमध्ये विद्यार्थ्यांनी केली समाजोपयोगी कामे

CD

येरडवमध्ये श्रमदानाचा सुंदर अविष्कार
विद्यार्थ्यांकडून बंधारे, पायवाट दुरुस्ती; प्रेरणा पुरस्काराने करण वाजेचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ११ ः तालुक्यातील पाचल येथील श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे येरडव येथे निवासी शिबिर झाले. त्यामध्ये वनराई बंधारा बांधून पाणीसाठा, ग्राम स्वच्छता, नदीपात्रात स्वच्छता, शोषखड्डा खुदाई, उगवाई ते येरडव सातवाहनकालीन मार्ग दुरुस्ती, सावंतवाडी ते धनगर वाडा पायवाट दुरुस्ती, बौद्धवाडी ते घाट रस्ता पायवाट दुरुस्ती यासांरखे श्रमदानातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने महाविद्यालयीन जीवनामध्ये पाठ्यपुस्तकीय ज्ञानासोबत सामाजिक बांधिलकीचे धडे गिरविले.
शिबिराच्या सांगता समारंभाला येरडवचे माजी सरपंच ज्ञानदेव दळवी, संस्थेचे सरचिटणीस नरेश पाचलकर, बाबा सावंत, प्रभारी प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम, येरडव ग्रामपंचायतचे सदस्य जगन्नाथ सावंत, ग्रामसेवक प्रदीप जाधव, पोलिसपाटील सयाजी जाधव, एकनाथ दळवी, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास पाटील आदी उपस्थित होते. आदर्श दैनंदिनी लेखनासाठी दीक्षा गांगणला, तर प्रेरणा पुरस्काराने करण वाजे याला गौरविण्यात आले. आदर्श स्वयंसेविका म्हणून निसर्गा धावडे, तर आदर्श स्वयंसेवक म्हणून भरत जोशी याला सन्मानचिन्ह देण्यात आले.

चौकट
स्नेहबंधचे प्रकाशन
निवासी शिबिरात विद्यार्थ्यांना आलेल्या अनुभवांचे लेखन केलेल्या ’स्नेहबंध’ हे हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी तीन नंबर गटाला आदर्श गट म्हणून, आदर्श श्रमदान व नियोजनाबाबत गट क्रमांक एकला, आदर्श सांस्कृतिक कार्यक्रमासाठी गट क्रमांक चारला, तर आदर्श भोजनासाठी गट क्रमांक दोनला गौरविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NED, T20 WC: टीम इंडियाचा विजयी चौकार! नेदरलँड्सने दिली कडवी झुंज; आता Super 8s मध्ये भारतासमोर ३ तगडे संघ

मोठी बातमी! उजनीतून सोडलेले पाणी कर्नाटकने आडविले, दक्षिण सोलापूरमधील शेती, गावे तहानली; तरीपण जलसंपदामंत्री विखे पाटील कॉल उचलेनात, वाचा...

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपींनी दिला कबुलीजबाब!

Dumper Accident : भरधाव डंपरची आठ वाहनांना धडक; कात्रज ते वडगावदरम्यान महामार्गावर थरार

Mangalwedha News : 1650 अल्पभूधारक शेतकऱ्यांना मनरेगा योजनेचा लाभ देण्याची सुनंदा आवताडे यांची भरत गोगावले यांच्याकडे मागणी

SCROLL FOR NEXT