कोकण

‘दीपतारांगण’तर्फे १४ रोजी मुंबईत रंगकर्मींचा गौरव

CD

10279

‘दीपतारांगण’तर्फे १४ रोजी मुंबईत रंगकर्मींचा गौरव

सिंधुदुर्गातील मधुकर मातोंडकर, शुभांगी भुजबळ, सायमन मार्टिन यांचा होणार सत्‍कार

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १२ : तळकोकणातील काही रंगकर्मींनी एकत्र येत मुंबईत नाटक चित्रपट, साहित्य आणि सांस्कृतिक, सामाजिक चळवळ याविषयी कामाला प्रारंभ केला आहे. दीपतारांगण क्रिएशनच्या माध्यमातून हे सांस्कृतिक काम केले जात आहे. या संस्थेतर्फे पहिला पुरस्कार सोहळा रविवारी १४ डिसेंबरला सायंकाळी साडेपाचला मुंबईत होणार आहे.

गोरेगाव येथील केशवराव गोरे स्मारकांमध्ये सिंधुदुर्गातील कवी अजय कांडर यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्र प्रशासनात उपआयुक्त म्हणून कार्यरत असणाऱ्या कवयित्री अंजली ढमाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. यात ज्येष्ठ नाटककार शफाअत खान यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांना गौरविण्यात येणार आहे. प्रत्येकी अकरा हजार रुपये, स्मृतीचिन्ह, शाल आणि ग्रंथ अशा स्वरूपाच्या चित्रपट नाटक पुरस्कारांमध्ये अभिनेत्री शुभांगी भुजबळ (मुंबई) यांना पंडित सत्यदेव दुबे पुरस्काराने तर साहित्य विभागात लेखक भाऊ पाध्ये पुरस्काराने सायमन मार्टिन (वसई) यांना आणि सांस्कृतिक चळवळ विभागांमध्ये प्रा. गोपाळराव दुखंडे पुरस्काराने सांस्कृतिक कार्यकर्ते मधुकर मातोंडकर (सिंधुदुर्ग) यांना गौरविण्यात येणार आहे.
चित्रपट नाटक साहित्य आणि चळवळ या क्षेत्रामध्ये अतिशय गंभीरपणे अनेक लोक काम करतात. मात्र, हौशीच्या पातळीवर काम करणाऱ्या किंवा मनोरंजनाला शरण गेलेल्या कलाकार लेखक आणि चळवळीतील कार्यकर्त्यांना गौरविण्यात येते. यात गंभीरपणे काम करून आयुष्य खर्च करणाऱ्या कलावंत साहित्यिक कार्यकर्ते उपेक्षित राहतात. अशा दुर्लक्षित राहिलेल्या व्यक्तींना गौरविण्यासाठी या वर्षापासून ही पुरस्कार योजना कोकणातील रंगकर्मीनी एकत्र येत सुरू केली आहे. यावर्षीच्या चित्रपट नाटक साहित्य आणि चळवळ पुरस्कारासाठी ज्या व्यक्तींची निवड केली, त्यांच्यासाठी स्वतंत्र समिती नेमली होती.

या समितीमध्ये ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी, ज्येष्ठ लेखक राजन गवस, रंगकर्मी दीपक राज्याध्यक्ष, समीक्षक नितीन रिंढे, रणधीर शिंदे आणि कवी अजय कांडर आदींचा समावेश होता. पुरस्कार विजेत्यांमधील अभिनेत्री शुभांगी भुजबळ यांची ‘आयदान’, ‘बया दार उघड’, ‘सावित्री’ आदी महत्त्वाची नाटके लक्षवेधी ठरली आहेत. तर कवी सायमन मार्टिन हे मराठीतील महत्त्वाचे कवी असून शोषित वंचितांबद्दल त्यांनी लेखन करताना त्याबद्दलची कृतीशीलताही दाखवली आहे आणि सांस्कृतिक कार्यकर्ते मधुकर मातोंडकर हे सुमारे ४० वर्ष निष्ठेने साहित्य सांस्कृतिक विषयक महत्त्वाचे काम करत आहेत. सिंधुदुर्ग भूमिपुत्र ज्येष्ठ इतिहासकार कृष्णराव अर्जुन केळुसकर, नाटककार जयंत पवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ चालविल्या जाणाऱ्या समाज साहित्य प्रतिष्ठानचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक उदय जाधव आणि दीपा सावंत खोत यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar AI Video: अजित पवारांच्या आवाजात खोटा एआय व्हिडीओ केल्यास कडक कारवाई; राष्ट्रवादी काँग्रेसचं पत्र

Mohammad Shami : मोहम्मद शमीच्या अडचणीत वाढ!, आता पत्नीने ठोठवला सुप्रीम कोर्टाचा दरवाजा

IND vs NED, T20 WC: इशान किशनची 'दुर्दैवी' विकेट! भारताच्या दोन्ही ओपनरचा 'दांडा' उडवणारा Aryan Dutt कोण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई

IND vs NED, T20 WC: अभिषेक शर्माचा 'गोंधळ'! भलत्याच खेळाडूची जर्सी घालून फलंदाजीला आला अन् आजही भोपळ्यावर माघारी परतला

SCROLL FOR NEXT