10880
हायटेक यंत्रणेमुळे जलतरणपटूंचा उत्साह
चिवला बिचची जलतरण स्पर्धा; ‘ऑटोमेटिक टायमिंग सिस्टिम’ लक्षवेधी
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १५ : येथील चिवला बिचवर आयोजित जलतरण स्पर्धेचा उत्साहात समारोप झाला. आंतरराष्ट्रीय स्पर्धेप्रमाणे यावर्षीपासून या स्पर्धेत ऑटोमेटिक टायमिंग सिस्टिम टच पॅड वापरली गेली. यात स्पर्धकांकडे रिस्ट वॉच होते. तो स्कॅन होईल. वेळ व नंबर त्यावर कळेल, असा त्यामागचा उद्देश होता. यामुळे स्पर्धकांचाही या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना यांच्या मान्यतेने व जिल्हा जलतरण संघटनेच्यावतीने आयोजित १५ व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत सुमारे १५०० स्पर्धक सहभागी झाले. विजेत्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली. रविवारी (ता.१४) विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव झाला.
यावेळी कृष्णा ढोलम, महेश कदम, भूषण मेतर, समीर म्हाडगुत, कुणाल मांजरेकर, आप्पा मालंडकर, डॉ. राहुल पंतवालावलकर, उद्योजक बंडू कांबळी, युसूफ चुडेसरा, सचिन शिंदे, किशोर पालकर, निल लब्दे, अरुण जगताप, समीर शिर्सेकर, डॉ. सचिन शिंदे, सुनील मयेकर, आदित्य डोयले, साहिल पालकर, इशिका पालकर, दीपाली डोईले, प्राची डोईले, राधिका पालकर, छाया डोईले, योगिता महाकाळ उपस्थित होते.
स्पर्धेचा उर्वरीत निकाल असा ः महिला - ४६ ते ५५ वयोगट अनुक्रमे- लता भोला आंबडे (नागपूर), शिजा अनुप (मुंबई), हिना राठोड (मुंबई). पुरूष- संजय आत्माराम जाधव (सांगली), प्रसाद कसबाजे (पुणे), संजय दत्तात्रय वलवडे (सांगली), अमोल बोडेले (नागपूर), जगदीश हिराजी पाटील (रायगड), निलेश शशिकांत कुलकर्णी (पुणे), अमीत खांडेकर (पुणे), दिपक ठाकूर (रायगड). उमेश लाड (मुंबई), विजय महाडीक (कोल्हापूर). महिला – २६ ते ३५ वयोगट- आसावरी निरगुडे (नाशिक), पूजा अल्हाद (मुंबई), मृण्मयी भोईर (मुंबई) पुरूष- सागर कांबळे (पुणे), महेश कुंटे (सोलापूर), भरत पाटील (बेळगाव), ओंकार वऱ्हाडे (नागपूर), उर्मीत पटेल (नागपूर), हितेश भोईर (रायगड), प्रितम पाटील (सांगली), दिपक वळवी (पुणे), ९. अक्षय महातो (मुंबई), आशिष चिजघरे (नागपूर). महिला ३६ ते ४५ वयोगट- लुबना चित्रवल्ला (मुंबई), वृषाली भारती (ठाणे), कविता मोरे (सातारा), निलम यादव (मुंबई), मिरा सोनवणे (पुणे), कविता पटेल (मुंबई), इशा कुलकर्णी (पुणे), अर्चना बलदावा (सोलापूर), वृषाली दाते (ठाणे), सुर्यकांता शिंदे (सोलापूर). पुरूष- अमर पाटील (रायगड), गिरीश मुलुक (पुणे), आदीत्य कलेले (नागपूर), श्रीराम मेस्त्री (मुंबई), गौरांग पाटील (मुंबई), मुकुंद शेलके (पुणे), केतन कुलकर्णी (पुणे), नरेश मणचे (ठाणे), स्वानंद देव (पुणे), खांतील दिक्षीत (पुणे). मुली १६ ते १८ वयोगट - जान्हवी धामी (मुंबई), केतकी खाडीलकर (सांगली), इरा भागवत (पुणे), किमया गायकवाड (बेळगाव), इशाना संतोष (ठाणे), सिद्धी बरड (कोल्हापूर), सृष्टी कांगराळकर (बेळगाव), प्राची लगदी (बेळगाव), दिव्या हरव्यासी (कोल्हापूर), तनिष्का कांबळे (कोल्हापूर). मुलगे - चैतज्ञ शिंदे (पुणे), पुष्कर गवळी (कोल्हापूर), ऋद्र मनाडे (कोल्हापूर), अलोक जाधव (नाशिक), साईश मालवणकर (ठाणे), प्रसाद साईनेकर (बेळगाव), अक्षत सावंत (ठाणे), ओम गणेकर (मुंबई), तहा वर्षावाला (नागपुर), विश्वा शिंदीकर (नाशिक).
पुरूष ५६ वर्षांवरील गट- नारायण हजरे (सांगली), श्रीमंत गायकवाड (सातारा), महादेव तावरे (पुणे), संभाजी गावडे (सांगली), श्रीरिष पत्की (पुणे), सखेराम बांदेकर (सिंधुदुर्ग), प्रकाश वराडकर (सिंधुदुर्ग), सचिन मुंज (पुणे), प्रकाश किल्लेदार (कोल्हापूर), कल्लपा पाटील (बेळगाव), महिला- मनिषा द्विवेदी (मुंबई), गायत्री फडके (पुणे), पुष्पा भट (मुंबई). मुलगे ११ ते १२ वयोगट- मोहित काकतकर (बेळगाव), क्रीश कुठे (रायगड), अबीर साळस्कर (ठाणे), सर्वम्म केळुसकर (ठाणे), संभव पाटील (कोल्हापूर), आबीर मांडवकर (ठाणे), भार्गव मोकतदान (नागपूर), अर्थव अवस्थी (बेळगावी), श्रीदत्त पुजारी (बेळगाव), श्रेयस जाधव (कोल्हापूर). मुली- गितीशा भंडारे (ठाणे), ओवी चिंदरकर (ठाणे), गरीमा पाटील (ठाणे), शर्वणी भारती (ठाणे), अकिरा खोत (पालघर), विधी भोर (ठाणे), अमुल्या कस्तीकर (बेळगाव), अस्मिा हिरवे (नाशिक), मनस्वी सोनावणे (पुणे), कृष्णा हव्यासी (कोल्हापूर). मुलगे १३ ते १५ वयोगट- शिवस्मीत बिरादार (छत्रपती संभाजी नगर), आदित्य बराडे (कोल्हापूर), रणबीरसिंग गौर (नागपूर), तनय लाड (ठाणे), वरूणराज डोंगळे (कोल्हापूर), शादुल लाते (पुणे), रूद्र सुलोकर (सिंधुदुर्ग), श्लोक कोकणे (ठाणे), विधान धुरी (सिंधुदुर्ग), आरव अहुजा (ठाणे). मुली- रेवा परब (ठाणे), हर्षदा चौधरी (ठाणे), राजनंदनी टिवले (कोल्हापूर), अथश्री भोसले (ठाणे), प्रिशा वर्मा (ठाणे), निधी घोणेला (ठाणे), स्पृहा उशीरकर (ठाणे), श्रीयांशा धोंडकर (नागपुर), सही मुंडे (पुणे), किया गोईल (ठाणे). पुरूष खुला गट- श्रेयस पराडकर, रचित नरसिंघानी, आदी गोसाळ, मिहीर चौघुगे, अर्जुन शाली, ऋग्वेद सुर्वे, अभिषेक खोचर, कौस्तुभजाधव, शिवम दत्ता, सुपियान जोशी. महिला खुला गट - विभुती पाटील, अभा मुंडे, स्वरा चाटे. मुलगे - १९ ते २५ वयोगट- भाग्येश पालव (कुडाळ), वरद कुवर (नाशिक), अनुज उगले (नाशिक), स्मरण मंगलोरकर (बेळगाव), सिद्धेश शेलार (कोल्हापूर), सुदाशु खुदे (नागपूर), कवटील्य मेश्राम (यवतमाळ), वेदांत तुमसरे (यवतमाळ), यश देवदास (रत्नागिरी), महेश डावरे (पुणे). मुली - अनुजा उगले (नाशिक), मिहीका कोळंबेकर (मुंबई), श्रेया कांबळे (कोल्हापूर), स्वरा सावंत (ठाणे), झोया सिंग (पुणे), श्रीया पटवा (अहमदनगर), आकांक्षा जाधव (नाशिक), भवानी रविकुमार (हैद्राबाद), आर्या भंडारी (पुणे), दिव्यांग पुरूष खुला- स्कंद घाडगे, तुषार जाधव, ध्रुव दिवाण, कौशिक तुनलाईत, पार्थ दिवाडकाय, दिपक गोगावले. महिला- दिव्या पिल्लयी, सोनाक्षी शुल्का, मंत्रा खुळे, जुई गावकर, साईशा सहानी, गार्गी कुवर, मनस्वी पाटील, प्रज्ञा देशमुख. मुली - ८ ते १० वयोगट- श्री शेट्टी (ठाणे), देवाश्री अस्टणकर (नागपूर), आशर्ती चिंदानवार (नागपूर), आरोही अवस्ती (बेळगाव), सायली घुगरेतकर (बेळगाव), वसुंधरा कसबे (नाशिक), तन्वी नवले (सोलापूर), श्रीया सावंत (पालघर), रूद्रा अवघडे (वर्धा), शरण्या बेजगामवार (पुणे). मुलगे - स्वराज गादे (पालघर), रक्षणसिंधु नदार (मुंबई), सत्यजितसिंह मोहिते (पुणे), प्रिन्स काढावाले (ठाणे), स्कंद घाडगे (बेळगाव), रियांश लाड (मुंबई), पार्थ हरोंगे (पुणे), रियांश ठाकूर (रायगड), तनय लोढा (पुणे), हर्षवर्धन कार्लेकर (बेळगाव). मुली ६ ते ७ वयोगट- काव्या वाघमारे (पुणे), नायरा कुमार (पुणे), लिलांशा नाईक (सिंधुदुर्ग), रूद्राणी पाटील (रायगड), समीधा गिंजे (नाशिक), निरा काडू (पुणे), सावी कुलकर्णी (पुणे), दिप्त्या हिवसे (नागपूर), पृथा कानिटकर (पुणे), सान्वी मोडक (पुणे). मुलगे- सिद्ध मुपिननेती (ठाणे), शर्वीर लते (पुणे), आशार काझी (नाशिक), रेयांश खामकर (ठाणे), वंश बिर्जे (बेळगाव), अद्वेत चाकणकर (पुणे), आदित्य मुणगेकर (ठाणे), मयंक चव्हाण (कोल्हापूर), शिवतेज पाटील (कोल्हापूर), अभिनंदन दोणे (वर्धा).
---
एकूण १५०० स्पर्धकांचा सहभाग
स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला मेडल, सहभाग प्रमाणपत्र व टी-शर्ट, कॅप देण्यात आले. ग्रुपमध्ये विजेत्यांना रोख बक्षिसे, भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. एकूण आठ लाख रुपये रकमेची पारितोषिके, भेटवस्तू देण्यात आली. आठ राज्यांमधील स्पर्धक आणि महाराष्ट्रातील बहुतांश सर्व जिल्ह्यांतील एकूण १५०० स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.