rat17p15.jpg-
11283
रत्नागिरी : ‘सह्याद्री क्लासिक’ सायकल रेसमध्ये पाचवा क्रमांक मिळवणारे रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे विनायक पावसकर.
सह्याद्रीच्या रांगांमध्ये अनुभवला सायकलिंगचा थरार
विनायक पावसकर; ‘सह्याद्री क्लासिक’ रेसमध्ये ५ वा क्रमांक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ : सह्याद्रीच्या रौद्र आणि नयनरम्य पर्वतरांगांमध्ये सायकलिंग करण्याचा थरार अनुभवत रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य सुपर रॅंडोनिअर विनायक पावसकर याने पार पडलेल्या ‘सह्याद्री क्लासिक’ सायकलिंग स्पर्धेत ११३ स्पर्धकांमधून तीन गटांमध्ये पाचवा क्रमांक पटकावला. या स्पर्धेत यश मिळवत त्याने स्वतःची शारीरिक क्षमता आणि मानसिक कणखरता सिद्ध केली आहे.
सह्याद्री क्लासिक स्पर्धेतील कामगिरीमुळे रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आणि रत्नागिरीचे नाव अधिक उंचावले आहे. पावसकर याने सांगितले, घाट उंच नसतात, उंच असते आपल्या प्रयत्नांची मर्यादा. हा संपूर्ण प्रवास फक्त पायांनी पॅडल मारण्याचा नसून, तो ''स्वतःला हरवून पुन्हा सापडण्याचा मानसिक प्रवास होता. स्पर्धेतील पहिला टप्पा होता तापोळाघाट, जो २६ किलोमीटरचा आणि ७३२ मीटर एलिवेशनचा आव्हानात्मक चढण मार्ग होता. शरीर थकले तरीही पहिल्या ग्रुपसोबत राहण्याचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवत जोरदार सायकलिंग केले. हा टप्पा १ तास १८ मिनिटांत पूर्ण करून ५वे स्थान मिळवले.
दुसऱ्या टप्प्यासाठी म्हणजेच केळघर घाटासाठी, विनायकने रणनीती आखली. अनुभवी सायकलस्वार प्रसाद आणि विक्रांत आलेकर यांच्या सल्ल्यानुसार त्याने नवीन स्ट्रॅटेजी केली आणि शेवटच्या ३ किलोमीटरमध्ये स्वतःची ओळख दाखवण्याची योजना निश्चित केली. हा १६ किलोमीटरचा टप्पा ५९५ मीटर एलिव्हेशनचा असूनही, विनायकने डोकं शांत ठेवून खेळ केला. पहिल्या ग्रुपपासून थोडे मागे पडला असला तरी अजित कुलकर्णींसोबतची त्याची लढत निर्णायक ठरली. त्याने हा टप्पा केवळ ६० मिनिटांत पूर्ण करत ४थ्या क्रमांकाने फिनिश लाइन गाठली.
या संपूर्ण स्पर्धेतील एकूण ११३ स्पर्धक आणि ३ गटांमधून विनायकने पाचवा क्रमांक मिळवला. त्यांचा चौथा क्रमांक अवघ्या १७ सेकंदांनी हुकला; मात्र या अनुभवाने स्वतःवरचा अधिक दृढ झालेला विश्वास, टीम रत्नागिरी सायकलिस्ट क्लबची भक्कम साथ आणि कुटुंबीय आणि मुलांचा त्याच्या यशावर असलेला ठाम विश्वास यांची कमाई केली.
कोट
स्वतःला घडवण्याची कार्यशाळा आणि जिद्दीचं मंदिर म्हणजे ही स्पर्धा आहे. कधी कधी रेसमध्ये पहिल्या ३ मध्ये नाही येता आलं तरी स्वतःला जिंकून येतो आणि तीच खरी चॅम्पियनशिप असते. भविष्यात आणखी जोरदार तयारीसह सहभागी होण्यासाठी सज्ज होत आहे.
- विनायक पावसकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.