कोकण

डॉक्युमेंटरी स्पर्धा प्रकारात घारपी शाळेची निवड

CD

swt1824.jpg
11654
घारपी ः येथे मुख्याध्यापक जे. डी. पाटील व शिक्षक विद्यार्थी यांचे अभिनंदन करताना मान्यवर.

डॉक्युमेंटरी स्पर्धा प्रकारात
घारपी शाळेची निवड
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १८ ः शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या वतीने चालू शैक्षणिक वर्षात शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या डॉक्युमेंटरी या स्पर्धा प्रकारात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपी या शाळेची कोल्हापूर विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
राज्य शासनाच्या वतीने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले असून, त्याअंतर्गत घारपी शाळेचे मुख्याध्यापक जे. डी. पाटील यांनी डॉक्युमेंटरी या स्पर्धा प्रकारात सहभाग नोंदवला होता. या डॉक्युमेंटरीमध्ये दिवाळी सणाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या विविध साहित्याची विक्री करून जमा केलेल्या निधीतून मराठवाड्यातील पूरग्रस्त शाळांमधील विद्यार्थ्यांना मदत या प्रेरणादायी शैक्षणिक उपक्रमाचे प्रभावी सादरीकरण केले आहे. या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमाची २६ डिसेंबरला होणाऱ्या कोल्हापूर विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड केली असून, या स्पर्धेत यश मिळाल्यास अंतिम राज्यस्तरीय स्पर्धा गोंदिंया येथे होणार आहे. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शाळेतील सहकारी शिक्षक आशिष तांदुळे, मुरलीधर उमरे, धर्मराज खंडागळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, तसेच ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. घारपी शाळेच्या या निवडीमुळे शाळा, शिक्षक, विद्यार्थी व परिसरात आनंदाचे वातावरण असून, सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकचा खरा चेहरा पुन्हा उघड! शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची उपस्थिती; पहलगाम हल्ल्याचा सूत्रधारही दिसला

Ravichandran Ashwin: वैभव सूर्यवंशीबाबत अश्विनचे मोठे विधान; 'पाणी द्यायलाही तयार राहा' म्हणत दिला खास सल्ला!

Mumbai Police: सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार

Degloor News : जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी देगलूरात भाजपची चाचपणी; आमदार अमर राजूरकरांचा दौरा

Latest Marathi News Live Update : ...तर माझे खासदार का फोडले- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT