-rat१९p२२.jpg-
२५O११८४५
नवी दिल्ली ः भारत मंडपम् येथे आयोजित केलेल्या राष्ट्र शंखनाद महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील थरारक आविष्कार सादर करताना कार्यकर्ते.
---
दिल्लीत घुमला शिवशौर्याचा निनाद
राष्ट्र शंखनाद महोत्सव ; जिल्ह्यातील २४ जण सहभागी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ ः दिल्लीतील भारत मंडपम् येथे सेव्ह कल्चर, सेव्ह भारत फाउंडेशन आणि सनातन संस्था यांच्यातर्फे आयोजित राष्ट्र शंखनाद महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शौर्याचा सजीव, थरारक आविष्कार पाहायला मिळाला. या महोत्सवात रत्नागिरी जिल्ह्यातील २४ जणांनी सहभाग घेतला होता.
महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शस्त्रकौशल्याचे प्रभावी प्रदर्शन, मणिपूर राज्याच्या पारंपरिक युद्धकलेचे तलवार, भाला व ढालींसह सादरीकरण करण्यात आले. हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून महिलांची छेडछाड व धर्मांधांकडून होणाऱ्या अत्याचारांना प्रतिकार करण्याची वास्तवदर्शी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. मणिपुरी थांग-ता युद्धकलेतील तलवार (थांग), भाला (ता), ढाल आणि युद्धतंत्र यांचे शास्त्रशुद्ध, शौर्यपूर्ण सादरीकरण महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरले. कोल्हापूरस्थित ‘सव्यासची गुरूकुलम्’ संस्थेच्यावतीने सादर करण्यात आलेल्या शौर्यप्रदर्शनात शिवकालीन युद्धतंत्र आणि मराठी शस्त्रपरंपरेचा प्रभावी समन्वय साधण्यात आला. यामध्ये शस्त्रांचा प्रत्यक्ष वापर, संकटसमयी आत्मरक्षण, महिलांवरील छेडछाडीप्रसंगी बचाव तसेच अनेकांकडून होणाऱ्या आक्रमणाला धैर्याने प्रतिकार कसा करावा याची सजीव प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यासोबतच ऋषिमुनींनी सांगितलेल्या सूर्यनमस्कार, चंद्रनमस्कार, भूमीनमस्कार तसेच विविध पारंपरिक व्यायामप्रकारांचे सादरीकरण करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.