कोकण

क्रीडा क्षेत्रामधून राष्ट्रसेवेची संधी

CD

swt2339.jpg
O13101
कणकवलीः जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या मुलांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

क्रीडा क्षेत्रामधून राष्ट्रसेवेची संधी
दत्तात्रय मारकडः ओझरम येथे तालुकास्तरीय क्रीडा महोत्सव
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २४ : खेळ हा केवळ मनोरंजन नसून तो शिस्त, आरोग्य, जिद्द व जबाबदारीचे संस्कार घडवतो. खेळातून स्वतःचे भविष्य घडवताना देशाचे नाव उज्ज्वल करणे हीच खरी राष्ट्रसेवा आहे, असे प्रतिपादन कणकवली तालुका क्रीडा समन्वयक दत्तात्रय मारकड यांनी केले. तालुकास्तरीय क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत मेरा युवा भारत या उपक्रमाअंतर्गत मेरा युवा भारत सिंधुदुर्ग, प्रज्ञांगण, तळेरे आणि शिवमुद्रा स्पोर्ट्स अकादमी यांच्यावतीने आयोजित कणकवली तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा रविवारी (ता. २१) शिवमुद्रा स्पोर्ट्स अकादमी मैदान, ओझरम फाटा येथे उत्साहात पार पडल्या. यातील गुणवंत खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
‘स्वास्थ्य राष्ट्र-समृद्ध राष्ट्र’ या संकल्पनेवर आधारित या स्पर्धांमध्ये १५ ते २९ वर्षे वयोगटातील एकूण ८६ स्पर्धक सहभागी झाले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून तालुका क्रीडा समन्वयक श्री. मारकड, सामाजिक कार्यकर्ते गणेश राणे, मुस्कान खान, अब्दुल खान, शिवमुद्रा स्पोर्टस अकादमीचे संचालक मयूर गोरुले, प्रज्ञांगणच्या संस्थापिका श्रावणी मदभावे, सतीश मदभावे आदी उपस्थित होते. पंच म्हणून विशाल मेस्त्री, साहिल गोरुले, हर्षद तोरस्कर व भावेश गोरुले यांनी काम पाहिले. यावेळी श्री. मारकड यांचा क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रज्ञांगण आणि शिवमुद्रा स्पोर्ट्सच्या वतीने सन्मान करण्यात आला. श्रावणी मदभावे यांनी सूत्रसंचालन केले. सतीश मदभावे यांनी आभार मानले.
स्पर्धेचा निकाल असा : मुलगे (१५-२९ वर्षे) गोळाफेक-सिद्धार्थ जठार, साईप्रसाद वानोळे, सिद्धेश साळुंखे. १०० मीटर धावणे-सिद्धार्थ जठार, प्रणय आडिवरेकर, तन्मय कदम. कबड्डी-कासार्डे ज्युनियर कॉलेज, सेव्हन स्टार. मुली (१५-२९ वर्षे) खो-खो-शिवकन्या ग्रुप, सिंधुकन्या. १०० मीटर धावणे-नेहा कदम, सानिया पाळेकर, दीक्षा पाताडे. गोळाफेक-सारिका राठोड, स्वप्नाली राठोड, ज्योती आडे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NED, T20 WC: टीम इंडियाचा विजयी चौकार! नेदरलँड्सने दिली कडवी झुंज; आता Super 8s मध्ये भारतासमोर ३ तगडे संघ

मोठी बातमी! उजनीतून सोडलेले पाणी कर्नाटकने आडविले, दक्षिण सोलापूरमधील शेती, गावे तहानली; तरीपण जलसंपदामंत्री विखे पाटील कॉल उचलेनात, वाचा...

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपींनी दिला कबुलीजबाब!

Dumper Accident : भरधाव डंपरची आठ वाहनांना धडक; कात्रज ते वडगावदरम्यान महामार्गावर थरार

Mangalwedha News : 1650 अल्पभूधारक शेतकऱ्यांना मनरेगा योजनेचा लाभ देण्याची सुनंदा आवताडे यांची भरत गोगावले यांच्याकडे मागणी

SCROLL FOR NEXT