कोकण

अधिकारी, कर्मचारीही श्रमदानात सक्रीय

CD

-rat२५p५.jpg-
२५O१३३४३
राजापूर ः सामाजिक बांधिलकीतून श्रमदानातून बांधलेल्या बंधाऱ्यासमवेत लोकप्रतिनिधीसह पंचायत समिती अधिकारी-कर्मचारी, ग्रामपंचायत अधिकारी.
------
अधिकारी, कर्मचारीही श्रमदानात सक्रिय
राजापूर तालुक्यातील चित्र; मिशन बंधारे मोहीम
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २६ ः पंचायत समिती, ग्रामपंचायतीसह पेन आणि कागद घेत विकासाचे नियोजन करणारे अधिकारी, कर्मचारी यांनी कुदळ आणि फावडे हाती घेत श्रमदानातून वनराई बंधारा बांधला.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत तालुक्यातील कोदवली येथे तालुका सरपंच संघटना, राजापूर तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटना, राजापूर पंचायत समिती अधिकारी-कर्मचारी आणि ग्रामपंचायत कोदवली यांच्यावतीने वनराई बंधारा बांधला. मिशन बंधारे उपक्रमांतर्गत श्रमदानातून बंधारा बांधण्यासाठी गटविकास अधिकारी तुकाराम जाधव, कृषी अधिकारी परेश सुर्वे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष मटकर, कोदवली सरपंच प्रणोती भोसले, ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे अध्यक्ष संतोष चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ, बचतगटाच्या महिला सहभागी झाल्या होत्या. या बंधाऱ्यामध्ये चांगलाच पाणीसाठा झाला असून, हा पाणीसाठा भविष्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
टंचाईवर मात करण्यासाठी दरवर्षी पंचायत समितीच्या नियोजनानुसार ग्रामपंचायतींच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून गावोगावी बंधारे बांधण्यात येतात. त्याप्रमाणे यावर्षीही लोकसहभागातून ठिकठिकाणी बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेतली आहे. जलस्रोत असलेल्या तालुक्यातील विविध ठिकाणी सध्या ग्रामपंचायती लोकसहभागातून बंधारे बांधत आहेत. संभाव्य पाणीटंचाईच्या काळात उपयुक्त ठरणाऱ्‍या मिशन बंधारे उपक्रमामध्ये प्रशासकीय कार्यालयांमध्ये नेहमी दिसणारे अधिकारी आणि कर्मचारीही सहभागी होऊ लागले आहेत.
या वेळी ग्रामस्थांसमवेत लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचारी हातामध्ये कुदळ-फावडा घेत प्रत्यक्षात बंधारे बांधकामामध्ये सहभागी झाल्याचे चित्र दिसत होते. काहीजण डोक्यावर घमेल्यातून माती वाहून नेताना तर काहीजण पिशव्यांमध्ये माती भरून नेतानाचे चित्र दिसत होते.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मुंबईतील भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! सिद्धिविनायक मंदिरासह 'ही' प्रसिद्ध मंदिरे बंद राहणार; कधी आणि का? जाणून घ्या वेळ

T20 WC, IND vs WI : विंडीजचे दोन्ही सलामीवीर एकाच दिशेने पळाले, पुढे काय घडले? बसणार नाही विश्वास, अर्शदीप सिंग स्टम्पकडे पळाला अन्...

Viral Video : मुलाने आईला पहिल्यांदाच घडवला विमान प्रवास, विंडो सीटवरून नजारा पाहताना पाणावले डोळे, हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल

Numerology News : 'या' जन्मतारखेवर जन्मलेल्या सुना असतात साक्षात लक्ष्मीचं रूप; नाराज कराल तर येईल गरिबी !

Navi Mumbai Crime: अमानुष मारहाणीत तरुणाचा मृत्यू, नवी मुंबईतील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकळले; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT