13791
पाट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश
म्हापण ः कोकण कला आणि शिक्षण केंद्र सावंतवाडीतर्फे आयोजित विविध स्पर्धांमध्ये पाट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश प्राप्त केले. यामध्ये चित्रकला स्पर्धेत सोहनी साळस्कर हिने द्वितीय. वेशभूषा स्पर्धेत दीक्षा मराळ द्वितीय, समूहनृत्य स्पर्धेत दिशा सामंत, आर्या चांदेकर, निधी केळुसकर, नृता राणे, ऋता मार्गी यांनी सादर केलेल्या नृत्याला द्वितीय क्रमांक मिळाला. निबंध स्पर्धेत चिन्मयी कोरगावर हिने तृतीय क्रमांक पटकावला. समूह नृत्याला द्वितीय क्रमांक, वक्तृत्व स्पर्धेमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवन चरित्रावर दिशा मरळ यांनी वक्तव्य करून तृतीय क्रमांक मिळविला. यशस्वी कलाकारांचे व मार्गदर्शक कला शिक्षक संदीप साळस्कर, सिद्धी चव्हाण, शैवाली परब यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक राजन हंजनकर, पर्यवेक्षक सयाजी बोंदर, आणि ज्येष्ठ शिक्षक उपस्थित होते. यावेळी सावंतवाडी नगराध्यक्षा श्रद्धा भोसले, लखमराजे भोसले, समीर शिर्के, दयानंद कुबल, परीक्षक प्रा. रुपेश पाटील, दीपक पाटेकर आदी उपस्थित होते.