कोकण

चिपळुणात भाजपाची निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी

CD

निवडणुकीसाठी भाजपची
चिपळुणात मोर्चेबांधणी
तालुक्यात गटनिहाय आढावा बैठका सुरू
चिपळूण, ता. २९ : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद गटनिहाय आढावा बैठकांना सुरवात केली आहे. यामध्ये भाजपला कोणत्या जागा लढवायच्या आहेत, याचा आढावा घेतला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांची युती होणार आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला युतीमध्ये स्थान मिळालेले नाही. त्यामुळे भाजप काही जागांवर दावा करणार आहे. चिपळूण नगरपालिकेत भाजपची ताकद पूर्वीपेक्षा जास्त वाढली आहे. ती ग्रामीण भागातही वाढावी यासाठी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत भाजपचे प्रतिनिधित्व करणारे सदस्य असायला हवे. यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, माजी आमदार डॉ. विनय नातू, भाजपाचे नेते प्रशांत यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष कार्यालयात जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणनाचा आढावा घेण्यात आला. डॉ. नातू, यादव, मोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. उमरोली, कळवंडे तसेच वहाळ, सावर्डे, कोकरे जिल्हा परिषद गटातील प्रमुख पदाधिकारी, शक्तीकेंद्र प्रमुख, बूथप्रमुख, कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार यांचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक जिल्हा परिषद गटातील बूथ, बूथ समिती, मतदार यादीचा आढावा घेण्यात आला. कार्यकर्त्यांनी युती, महायुतीचा निर्णय लवकरात लवकर करून उमेदवार जाहीर करावे तसेच आपापल्या भागातील विषय मांडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NED, T20 WC: टीम इंडियाचा विजयी चौकार! नेदरलँड्सने दिली कडवी झुंज; आता Super 8s मध्ये भारतासमोर ३ तगडे संघ

मोठी बातमी! उजनीतून सोडलेले पाणी कर्नाटकने आडविले, दक्षिण सोलापूरमधील शेती, गावे तहानली; तरीपण जलसंपदामंत्री विखे पाटील कॉल उचलेनात, वाचा...

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपींनी दिला कबुलीजबाब!

Dumper Accident : भरधाव डंपरची आठ वाहनांना धडक; कात्रज ते वडगावदरम्यान महामार्गावर थरार

Mangalwedha News : 1650 अल्पभूधारक शेतकऱ्यांना मनरेगा योजनेचा लाभ देण्याची सुनंदा आवताडे यांची भरत गोगावले यांच्याकडे मागणी

SCROLL FOR NEXT