कोकण

नववर्ष स्वागत कार्यक्रमातील गैरप्रकार थांबविणे आवश्यक

CD

14494

नववर्ष स्वागत कार्यक्रमातील
गैरप्रकार थांबविणे आवश्यक

‘प्रज्ञांगणचे पालकमंत्र्यांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ३० : इंग्रजी नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर समाजात वाढणारे मद्यपान, अमली पदार्थांचा वापर, सार्वजनिक ठिकाणी होणारा गोंधळ तसेच कायदा-सुव्यवस्थेच्या व नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित प्रश्न याबाबत जनजागृती करण्यासाठी एक सकारात्मक आणि अनुकरणीय उपक्रम प्रज्ञांगणच्या बालचमूंच्यावतीने राबविण्यात आला.
डॉ. अनिल नेरुरकर प्रणित प्रज्ञांगणच्या बालचमूंच्या वतीने, सामाजिक कार्यकर्त्या श्रावणी मदभावे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा वर्षांच्या स्पर्शिका मदभावे हिने पालकमंत्री नीतेश राणे यांना निवेदन सुपूर्द केले. निवेदनात म्हटले आहे की, ३१ डिसेंबरच्या रात्री होणाऱ्या गैरप्रकारांवर नियंत्रण, अवैध मद्यविक्री व नशेच्या पदार्थांवर कठोर कारवाई, सार्वजनिक ठिकाणी शिस्त व सुरक्षितता राखणे, तसेच ''उन्माद नको, आनंदाचा जल्लोष'' हा सकारात्मक संदेश समाजात पोहोचवण्याची आवश्यकता आहे. यावेळी मेधांश मदभावे याने स्वतः तयार केलेले नववर्षाभिनंदनाचे शुभेच्छा कार्ड पालकमंत्र्यांना देऊन नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. पालकमंत्री राणे यांनी बालचमूंच्या या उपक्रमाचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे समाजात शिस्तबद्ध व सुरक्षित नववर्ष स्वागताचे वातावरण निर्माण होण्यास हातभार लागेल, असे त्यांनी सांगितले. प्रज्ञांगणचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar AI Video: अजित पवारांच्या आवाजात खोटा एआय व्हिडीओ केल्यास कडक कारवाई; राष्ट्रवादी काँग्रेसचं पत्र

Mohammad Shami : मोहम्मद शमीच्या अडचणीत वाढ!, आता पत्नीने ठोठवला सुप्रीम कोर्टाचा दरवाजा

IND vs NED, T20 WC: इशान किशनची 'दुर्दैवी' विकेट! भारताच्या दोन्ही ओपनरचा 'दांडा' उडवणारा Aryan Dutt कोण?

Latest Marathi News Live Update : अजित पवारांच्या आवाजात खोटे ‘व्हिडीओ’ बंद करावेत – तटकरे

IND vs NED, T20 WC: अभिषेक शर्माचा 'गोंधळ'! भलत्याच खेळाडूची जर्सी घालून फलंदाजीला आला अन् आजही भोपळ्यावर माघारी परतला

SCROLL FOR NEXT