स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचा
आजपासून ठेववृद्धी मास
रत्नागिरी, ता. ३१ : स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या नववर्ष स्वागत ठेव योजनेचा प्रारंभ उद्यापासून (ता. १) होत आहे. सन २०२६ सालचे स्वागत करतानाच पतसंस्था ४०० कोटींचा ठेव टप्पा गाठण्याच्या जवळ आहे. आज वर्षअखेरीस ३९४ कोटींच्या ठेवी संकलित असून नव्या वर्षाच्या प्रारंभीच ४०० कोटींचा ठेव टप्पा स्वरूपानंद पतसंस्था पूर्ण करेल, असा विश्वास अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला.
स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या १७ शाखा ठेवीदारांच्या स्वागतासाठी, नववर्षाच्या शुभकामना देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. विविध ठेव योजना घेऊन ग्राहक, ठेवीदार, सभासद यांचेसाठी विश्वासार्ह, आकर्षक गुंतवणुकीच्या संधी घेऊन स्वामी स्वरूपानंदने नववर्ष स्वागत ठेव योजना घोषित केल्या आहेत.
स्वरूपांजली ठेव योजना १६ ते १८ महिने सर्वसाधारण ८ टक्के व ज्येष्ठ नागरिक, महिलांसाठी ८.१० टक्के, सोहम ठेव योजना १९ ते ३६ महिने (मासिक व्याज) सर्वसाधारण ८.१० टक्के व ज्येष्ठ नागरिक, महिला ८.२५ टक्के याप्रमाणे आकर्षक योजना देतानाच महिला व ज्येष्ठ नागरिक यांना अधिकच्या व्याजदर योजना जाहीर केल्या आहेत. एक रक्कमी ५ लाख किंवा अधिक ठेवीसाठी ८.५० टक्के व्याजदर घोषित केला आहे.
स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचा संमिश्र व्यवसाय ६७९ कोटी रुपये झाला असून संस्थेच्या स्वनिधीत वाढ होत स्वनिधी ५४ कोटी ३९ लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे. भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण २८ टक्के झाले आहे. सी.डी.रेशो ६३.१९ टक्के झाला आहे. संस्थेच्या गुंतवणुका १६९ कोटी ८६ लाख रुपये झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नववर्ष स्वागत ठेव योजनेत गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करावी, असे आवाहन ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.