कोकण

वेंगुर्लेतील विकासकामांसाठी भाजप प्रयत्नशील

CD

swt125.jpg
14941
अणसूर पाल ः विकासकामांचा भूमिपूजन सोहळा मनीष दळवी, पप्पू परब यांच्या उपस्थितीत झाला.

वेंगुर्लेतील विकासकामांसाठी भाजप प्रयत्नशील
मनीष दळवीः पालमधील २ कोटींच्या कामांचे भूमिपूजन
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १ः पाल गावातील तीन महत्त्वाच्या विकासकामांना मत्स्य व बंदर विकासमंत्री नीतेश राणे यांच्या महाराष्ट्र सागरी मंडळ निधीतून आणि बजेटमधून मिळून सुमारे २ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. या कामांचे भूमिपूजन बुधवारी (ता. ३१) जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व भाजप तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब यांच्या उपस्थितीत करण्यात आली. वेंगुर्ले तालुक्यातील विकासकामे मार्गी लागण्यासाठी भाजप नेहमी प्रयत्न आहे, असे प्रतिपादन यावेळी श्री. दळवी यांनी केले.
पाल गावातील विकासकामे पूर्ण व्हावीत, यासाठी सरपंच कावेरी गावडे आणि सोसायटी चेअरमन कमलेश गावडे यांनी पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे गावातील पाल झेंडोबा मंदिर ते अणसूर पुलापर्यंत संरक्षक भिंत बांधणे या कामासाठी एक कोटी रुपये आणि आसोली पाल खारभूमी बंधारा बांधणे या कामासाठी ७० लाख रुपये निधी मंत्री राणे यांच्या महाराष्ट्र सागरी मंडळ निधीतून मंजूर झाला आहे. तसेच वादळवाडी स्कूल या ठिकाणी रिटनिंग ऑल बांधणे या कामासाठी महाराष्ट्र शासन बजेट अंतर्गत २० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. गावातील या महत्त्वाच्या कामांचे भूमिपूजन दळवी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी सोसायटी चेअरमन कमलेश गावडे, नगरसेवक प्रणव वायंगणकर, तुळस माजी सरपंच शंकर घारे, पाल सरपंच कावेरी गावडे, सदस्य श्रीकांत गावडे, प्रदीप मुळीक, स्नेहल पालकर, शामल केरकर तसेच राजू गावडे, अनिल गावडे, हरी गावडे, ओंकार गावडे, अंकुश गावडे, नंदू गावडे, मधुकर गावडे, सीताराम गावडे आणि झेंडोबा कला, क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NED, T20 WC: टीम इंडियाचा विजयी चौकार! नेदरलँड्सने दिली कडवी झुंज; आता Super 8s मध्ये भारतासमोर ३ तगडे संघ

मोठी बातमी! उजनीतून सोडलेले पाणी कर्नाटकने आडविले, दक्षिण सोलापूरमधील शेती, गावे तहानली; तरीपण जलसंपदामंत्री विखे पाटील कॉल उचलेनात, वाचा...

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपींनी दिला कबुलीजबाब!

Dumper Accident : भरधाव डंपरची आठ वाहनांना धडक; कात्रज ते वडगावदरम्यान महामार्गावर थरार

Mangalwedha News : 1650 अल्पभूधारक शेतकऱ्यांना मनरेगा योजनेचा लाभ देण्याची सुनंदा आवताडे यांची भरत गोगावले यांच्याकडे मागणी

SCROLL FOR NEXT